BCCI चं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय? ग्रेडनुसार खेळाडूंना किती सॅलरी मिळते? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

BCCI Central Contract : मागील अनेक दिवसांपासून चर्चा असणाऱ्या बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची अखेर घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या वरिष्ठ पुरुष संघासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंसह नवख्या खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे. तेव्हा BCCI चं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय?  ग्रेडनुसार खेळाडूंना किती सॅलरी मिळते? इत्यादींविषयी जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Apr 21, 2025, 02:03 PM IST
twitter
1/7

बीसीसीआयने वर्ष 2024-25 साठी भारताच्या वरिष्ठ पुरुष संघासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. नेहमी प्रमाणे यात खेळाडूंना  A+, A, B आणि C अशा ग्रेड कॅटेगरीमध्ये विभागण्यात आले असून यात 5 नव्या खेळाडूंचा समावेश सुद्धा करण्यात आला आहे. 

twitter
2/7

बीसीसीआयचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट हे वार्षिक रिटेनरशिप प्रणाली आहे. जे क्रिकेटर्सला त्यांचे प्रदर्शन, भारतीय क्रिकेटमधील योगदान, इत्यादींच्या आधारे वर्गीकृत आणि पुरस्कृत करते. 

twitter
3/7

बीसीसीआयनुसार सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट अशा खेळाडूंना दिला जातो ज्यांनी एका सत्रात ३ टेस्ट सामने किंवा ८ वनडे किंवा १० टी २० सामने खेळले आहेत. जर खेळाडू या मापदंडात बसत असेल तर तो रिटेनरशिपसाठी पात्र ठरतो. 

twitter
4/7

बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टच्या 4 कॅटेगरी असतात यात A+, A, B आणि C यांचा समावेश असतो. खेळाडूंच्या योग्यतेनुसार त्यांना विविध कॅटेगरीमध्ये विभागले जाते. यानुसार त्यांना वर्षाचा पगार दिला जातो. 

twitter
5/7

बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार A+ ग्रेडमध्ये मोडणाऱ्या खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये, A ग्रेडमधील खेळाडूंना ५ कोटी, B ग्रेडमधील खेळाडूंना ३ कोटी तर C ग्रेडमधील खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जातात. 

twitter
6/7

यंदा बीसीसीआयने A+ ग्रेडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह इत्यादींचा समावेश केला आहे. बीसीसीआयच्या ग्रेड A सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, केएल राहुल, रिषभ पंत, शुभमन गिल, हार्दिक पंड्या इत्यादी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. 

twitter
7/7

तर B कॅटेगरीमध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर इत्यादींचा समावेश आहे. तसेच C ग्रेड कॅटेगरीमध्ये वरुण चक्रवर्ती, अभिषेक शर्मा, नीतीश राणा, हर्षित राणा, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिष्णोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन, आकाश दीप इत्यादींचा समावेश आहे. 

twitter