गिधाडांची कमी होत जाणारी संख्या ठरली 5 लाख लोकांच्या मृत्यूस कारणीभूत, कारण काय?

सध्या भारतात गिधाडांची संख्या कमी होत चालली आहे. गिधाडांच्या संख्या कमी झाल्याने दरवर्षी जवळपास 1 लाखांहून अधिक लोकांना स्वत: चा जीव गमवावा लागला. शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध समस्या उद्भवत आहेत.  

Dec 29, 2024, 13:18 PM IST
1/7

Vulture role in ecosystem: सध्या भारतात गिधाडांची संख्या कमी होत चालली आहे आणि याचा परिणाम लाखो लोकांच्या आयुष्यावर होताना दिसत आहे. खरंतर, मेलेल्या जनावरांवर गिरक्या घेणाऱ्या गिधाडांची कीळस येणं साहजिकच आहे. परंतु, गिधांडांमुळे पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होते. आजारी असलेल्या गायींच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमुळे गिधांडांचा मृत्यु ओढवू शकतो, असं समोर आलं आहे.   

2/7

आजारी असलेल्या गुरांना वेदना कमी करण्यासाठी अगदी स्वस्त डायक्लोफेनेक औषध दिले जाते. हे औषध गिधाडांची संख्या कमी होण्याला कारणीभूत आहे, अशी माहिती आकड्यांनुसार मिळाली आहे.  

3/7

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 1990व्या दशकामध्ये गिधाडांची संख्या ही 5 कोटींच्या आसपास पाहायला मिळत होती. परंतु, कालांतराने ही संख्या शून्यावर पोहचत असल्याचे दिसत आहे. गिधाडांची संख्या कमी होण्यामागे डायक्लोफेनेक औषध कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.   

4/7

गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे मनुष्याचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. कारण 'गिधाडांच्या मृत्युमुळे पर्यावरणासाठी आणि शरीरासाठी घातक असलेल्या बॅक्टेरिया आणि संसर्गाचे प्रमाण वाढत आहे आणि यामुळे 5 वर्षात जवळपास 5 लाख लोकांचा मृत्यु ओढवला आहे.', असे अमेरिकन इकोनॉमिक असोसिएशन जर्नलमधील प्रकाशित झालेल्या अध्ययनात म्हटलं गेलं आहे.  

5/7

आपल्या इकोसिस्टममध्ये प्रत्येकाची भूमिका ही वेगवेगळी आणि महत्त्वपूर्ण असते. पर्यावरणात गिधाडांचे स्थान सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. शिकागो विश्वविद्यालयाचे हॅरिस स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसिचे प्रोफेसर म्हणतात, "गिधाड आपल्या पर्यावरणात स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मेलेल्या जनावरांमुळे पसरणाऱ्या घातक बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी गिधाड कारणीभूत ठरतात आणि त्यांच्या अनुपस्थितीत विविध प्रकारचे आजार उद्धवू शकतात."   

6/7

तज्ज्ञांच्या अनुमानानुसार, वर्ष 2000 ते 2005 या कालावधीत गिधाडांच्या संख्या कमी झाल्याने दरवर्षी जवळपास 1 लाखांहून अधिक लोकांना स्वत: चा जीव गमवावा लागला. गिधाड जे बॅक्टेरिया पर्यावरणातून नष्ट करतात, तेच या लाखो लोकांच्या मृत्युला कारणीभूत ठरले. कोणतीही प्रजाती विलुप्त झाल्याने त्याचा मनुष्याच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो.  

7/7

शेतकऱ्यांना सुद्धा गिधाडांची खूप मदत होते. विशेषत: मेलेल्या जनावरांचे प्रेत नष्ट करण्यासाठी शेतकरी गिधाडांवरच अवलंबून असतात. गिधाडांची संख्या कमी झाल्याने शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध समस्या उद्भवत आहेत.