खाटेखाली येऊन झोपली होती मगर, शेतकऱ्याने पाहिलं आणि झोपच उडाली

Mar 29, 2019, 17:02 PM IST
1/4

कुत्रे भूकत असल्याने जाग आली

कुत्रे भूकत असल्याने जाग आली

मलातज गावात राहणाऱ्या बाबूभाई यांची झोप उडाली जेव्हा त्यांनी आपल्य़ा घरात मगरीला पाहिलं. घराच्या आजुबाजुला असलेले कुत्रे भुंकू लागल्याने त्यांना रात्री जाग आली. त्यांना शंका आल्याने त्यांनी जेव्हा खाटेखाली पाहिलं तर त्यांना धक्काच बसला.

2/4

गावकरी आले धावून

गावकरी आले धावून

बाबूभाई यांनी घरात मगर घुसल्याची माहिती गावातल्या लोकांना दिली. यानंतर गावातल्या लोकांनी या ठिकाणी धाव घेतली. ८ फुट लांब ही मगर होती.

3/4

तलावातून घरात आली होती मगर

तलावातून घरात आली होती मगर

ही मगर गावापासून २०० मीटर दूर असलेल्या तलावातून या घरात आली होती. मालताज देशभरात मगरींसाठी प्रसिद्ध आहे.

4/4

अधिकाऱ्यांनी मगरीला तलावात सोडलं

अधिकाऱ्यांनी मगरीला तलावात सोडलं

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि दया फाउंडेशनच्या सदस्यांनी मगरीला तलावात सोडलं. ही मगर आणखी अंडी देणार असल्याने त्याची काळजी घेण्यात आली.