Iftar Party: कोण आहे Baba Siddique? ज्यांच्या एका इशाऱ्यावर अख्खं बॉलिवूड हजर होतं!

Who is Baba Siddique? दरवर्षी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची (Baba Siddique's Iftar Party) जोरदार चर्चा होताना दिसते. मात्र, ज्याच्या एका निमंत्रणावरून अख्खं बॉलिवूड (Bollywood) हजर होतं, ते बाबा सिद्दीकी आहेत तरी कोण? 

Apr 20, 2023, 20:45 PM IST

Baba Siddique Iftar Party: दरवर्षीप्रमाणे बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केलं होतं, ज्यामध्ये सलमान खानसह (Salman Khan) अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. बॉलिवूडला अलविदा करणारी सना खानही (Sana Khan) पती मुफ्ती अनस सईदसोबत इफ्तार पार्टीत (Iftar Party) पोहोचली होती. रितेश-जेनेलिया (Ritesh-Genelia) तसेच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. दरवर्षी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची (Baba Siddique's Iftar Party) जोरदार चर्चा होताना दिसते. मात्र, ज्याच्या एका निमंत्रणावरून अख्खं बॉलिवूड (Bollywood) हजर होतं, ते बाबा सिद्दीकी आहेत तरी कोण? 

1/6

दरवर्षीप्रमाणे 16 एप्रिलला बाबा सिद्धीकी यांनी यंदाही जोरदार इफ्तार पार्टी दिली. त्यावेळी बॉलिवूडचा भाईजान सलमानसह इम्रान हाशमी, उर्मिला मातोंडकर, प्रीति जिंटा आणि कपिल शर्मा यांनी हजेरी लावली होती. जाणून घ्या कोण आहे बाबा सिद्धीकी (Baba Siddique)?

2/6

बाबा सिद्दीकी यांचे वडील वांद्रे येथील एका घड्याळ बनवण्याचे काम करायचे. तरुण वयात शिकत असताना त्यांचा राजकारणात रस निर्माण झाला. राजकारणात येण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले आणि 1977 मध्ये एनएसयूआय मुंबईचे सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहण्याचं ठरवलं. 1980 मध्ये वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि 1982 मध्ये अध्यक्ष देखील झाले. 

3/6

बाबा सिद्दीकी यांनी त्यानंतर महापालिकेवर त्यांनी आपला वचक बसवला. महापालिकेत त्यांची वाढती ताकद पाहता, त्यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तिकीट मिळालं. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग 3 वेळा विधानसभेत पोहोचले.

4/6

2004 ते 2008 या काळात बाबा सिद्दीकी मंत्रीही होते. सध्या त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी या मतदारसंघातून आमदार आहे. राजकारणात असताना त्यांची ओळख झाली ती सुनील दत्त यांच्याशी. त्याकाळात सुनील दत्त यांना बॉलीवूडमध्ये मानाचं स्थान होतं. संजय दत्त यांनी सलमान आणि सिद्दीकी यांची भेट घालून दिली आणि सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा सुरू झाली.

5/6

बाबा सिद्दीकी म्हणजे मुंबईतील बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यामधील दुवा, असा आरोप देखील अनेकदा केला जातो. मात्र, यावर चर्चा ही चर्चा राहिली. बाबा सिद्दीकी अनेकदा ईडीच्या रडारवर आहेत. मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्यात त्यांचं नाव समोर आलं होतं.

6/6

दरम्यान, 2017 मध्ये मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात ईडीने त्याच्या घरावरही छापा टाकला होता. मात्र, नंतर प्रकरण थंड झालं आणि कारवाई नंतर झाली नाही. बॉलिवूड कलाकारांमध्ये बाबा सिद्दीकी यांना वेगळं स्थान आहे. त्यामुळे त्यांचा शब्द अखेरचा मानला जातो. शाहरूख आणि सलमान यांच्यातील वाद सिद्दीकी यांनीच मिटवला, अशी देखील खुसपूस ऐकायला मिळते.