धर्मेंद्र यांची 450 कोटींची संपत्ती कोणा कोणाला मिळणार? 'ईशा आणि अहानाला प्रॉपर्टी...'; सनी देओलचा मोठा खुलासा

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सातत्याने त्यांच्या संपत्तीची वाटणी कशी होणार याबद्दल चर्चा होतंय. आता धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा आणि अभिनेता सनी देओलने खुलासा केला आहे. 

Neha Choudhary | Dec 02, 2025, 11:25 PM IST
twitter
1/10

धर्मेद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी 24 नोव्हेंबर 2025 ला अखरेचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले होते आणि त्यांना दोन पत्नीसह 6 मुलं आहे. दुसरी पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांना दोन मुली आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या संपत्तीचा वाटा कसा होणार याची चर्चा सुरु आहे. 

twitter
2/10

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीच्या वारसा हक्कावरून चाहत्यांमध्येही विविध चर्चा रंगल्या आहे. अनेक कायदेशीर बाबी गुगलवर सर्च करण्यात येत आहेत. धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती ही 450 कोटींच्या घरात आहे.

twitter
3/10

धर्मेंद्र यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर आणि सनी, बॉबी, अजिता, विजेता ही चार मुलं, दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि ईशा, अहाना या दोन मुली असा मोठं कुटुंब त्यांचं आहे. एवढंच नाही तर त्यांना 13 नातवंडंदेखील आहेत.

twitter
4/10

धर्मेंद्र यांच्या मृत्यूपत्रात संपत्तीचा वाटणीबद्दल काय लिहिलं आहे, ईशा आणि अहाना यांच्याबद्दल काय लिहिलं आहे. त्यांना संपत्ती वाटा आहे की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थितीत करण्यात येत आहे. 

twitter
5/10

 नुकताच एका रिपोर्ट्सनुसार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्या संपत्तीबद्दल सनी देओलने खुलासा केला आहे. अभिनेत्याने म्हटलं आहे की, ईशा आणि अहाना देओल यांना धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीतून त्यांचा पूर्ण हिस्सा देण्यात येणार आहे.  

twitter
6/10

 देओल कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तीने याबद्दल माहिती दिली आहे. त्या व्यक्तीने सांगितलं आहे की, ईशा आणि अहाना यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याची सनी देओलची अजिबात इच्छा नाही. तर सर्व मुलांना त्यांचा हक्क मिळावा, अशी धर्मेंद्र यांचीही इच्छा होती, असं त्या व्यक्तीने सांगितलं आहे. 

twitter
7/10

‘फर्स्ट पोस्ट’ने एका रिपोर्टमध्ये सूत्रांनुसार धर्मेंद्र यांच्या संपत्तीवरून सनी बॉबी आणि ईशा अहाना याबद्दल काही बातम्या समोर आल्या होत्या. त्या बातम्या खोट्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

twitter
8/10

त्या व्यक्तीने पुढे सांगितलं की, इथे कोणीच गरीब नसून त्यामुळे कोणताच ड्रामा किंवा कोणताच वाद इथे संपत्तीवरुन होतो. ईशा आणि अहाना यांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवलं जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. 

twitter
9/10

संपूर्ण देओल कुटुंब सध्या शोकाकुल असून पुढे काय होणार, हे विचार करण्याच्या मनस्थितीत कोणीच नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

twitter
10/10

धर्मेंद्र यांच्या मुंबईत आलिशान बंगला आणि लोणावळ्यात फार्महाऊस आहे. याच फार्महाऊसमध्ये धर्मेंद्र त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरसोबत राहायचे. 

twitter