Car Tires: गाडीचे टायर नेहमीच काळे का असतात?

Bizarre News: तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की गाडीचे टायर हे काळेच का असतात जेव्हा रबर पांढरा असतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर चला याचे योग्य उत्तर जाणून घ्या.   

तेजश्री गायकवाड | Apr 15, 2025, 13:22 PM IST

Bizarre News: तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की गाडीचे टायर हे काळेच का असतात जेव्हा रबर पांढरा असतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर चला याचे योग्य उत्तर जाणून घ्या. 

1/7

Bizarre News: तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की गाडीचे टायर हे काळेच का असतात जेव्हा रबर पांढरा असतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर चला याचे योग्य उत्तर जाणून घ्या.   

2/7

टायर्स पाहिल्यानंतर अनेकदा हा प्रश्न पडतो की जेव्हा रबराचा रंग पांढरा असतो, तर टायर्स नेहमीच काळ्या रंगाचेच का असतात. जेव्हा लोक हवा असेलला  गाडीचा रंग घेण्यासाठी बराच वेळ वाट पाहतात. तेव्हा कधी टायरचा रंगाबद्दल विचार करत नाहीत का? खरतर टायर फक्त काळ्या रंगात उपलब्ध आहेत ही एक मनोरंजक गोष्ट आहे.   

3/7

खरंतर, टायर्सची ताकद आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी, रबरमध्ये 'कार्बन ब्लॅक' नावाचा घटक जोडला जातो. हा घटक काळ्या रंगाचा असतो. यामुळेच टायर्सचा रंगही काळा होतो. खूप कमी लोकांना माहिती आहे की जेव्हा 125 वर्षांपूर्वी पहिल्यांदा रबर टायर बनवले गेले तेव्हा ते पांढऱ्या रंगाचे होते कारण त्यावेळी वापरले जाणारे रबर नैसर्गिकरित्या दुधाळ पांढऱ्या रंगाचे होते.  

4/7

आता प्रश्न असा पडतो की टायर्स आणि रस्त्यांचा रंग एकच कसा? तर टायरचाही रंग काळा ठेवण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे गाडी चालवल्यानंतर  त्यांचा रंग सहजासहजी बदलत नाही. जर टायरचा रंग कालांतराने फिकट झाला किंवा वेगळा दिसू लागला तर वाहनाचा संपूर्ण लूक खराब होऊ शकतो.

5/7

नवीन गाडी खरेदी केली आणि काही काळानंतर तिचे टायर रंग बदलू लागले, तर ते अजिबात चांगले दिसणार नाही. म्हणूनच टायर फक्त काळ्या रंगात बनवले जातात. यामागे वैज्ञानिक कारणे आहेत, जी आधी सांगितली आहेत.  

6/7

जर टायर लाल किंवा पिवळ्यासारख्या चमकदार रंगाचे असतील तर ते रस्त्याच्या रंगाशी मॅच होणार नाहीत तर,  ते डोळ्यांना त्रास देणारे देखील ठरतील, ज्यामुळे ड्रायव्हरचे लक्ष विचलित होऊ शकते. याशिवाय, टायरच्या पृष्ठभागावर बनवलेले खोबणी सारखी रचना ही रस्त्यावर त्याची पकड मजबूत करतात.  

7/7

या खोबणीमुळे घर्षण वाढते, ज्यामुळे टायर घसरण्यापासून रोखले जाते आणि गाडी स्थिर राहते. तथापि, टायर जसजसे खराब होतात तसतसे त्यांची पकड देखील हळूहळू कमी होते.