Winter Vibes : ये हसीं वादियां.... ये खुला आसमां...

काश्मीर खोऱ्यात गेल्या ४० दिवसांपासून चौथ्यांदा मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीर राष्ट्रीय राजमार्ग,सरनागत लेह राजमार्ग,मुगल रोड इथल्या वाहतुकीवर परिणाम झालाय. गेल्या आठवड्यापासून विमान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. साडेतीन फुटांपर्यंत बर्फ साचला असून, तापमान तर उणे १.४ पर्यंत पोहचलं आहे.

Dec 14, 2019, 16:24 PM IST
1/7

2/7

Winter Vibes : ये हसीं वादियां.... ये खुला आसमां...

पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. येथील बऱ्याच परिसरामध्ये झाडं, घर, रस्त्यांवर जणू निसर्गाने बर्फाची चादर पसरल्यामुळे ये 'हसीं वादियां.... ये खुला आसमां...' हे गाणं आठवल्यावाचून राहात नाही. 

3/7

Winter Vibes : ये हसीं वादियां.... ये खुला आसमां...

संपूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  आणखी दोन ते तीन दिवस बर्फवृष्टी अशीच राहणार असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं आहे. 

4/7

Winter Vibes : ये हसीं वादियां.... ये खुला आसमां...

बर्फवृष्टीमुळे किन्नौर भागाचा संपर्क तुटलाय. तर कुल्लू शहर पूर्णपणे बर्फाने वेढून गेलं आहे. इथल्या महादेव मंदीरावरही निसर्गाने बर्फाची चादर पसरली तर  शिवलिंग ही बर्फाने वेढलंय. 

5/7

Winter Vibes : ये हसीं वादियां.... ये खुला आसमां...

मंडी भागातल्या अनेक नद्या गोठून गेल्या आहेत. इतकी थंडी आहे की नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्येही बर्फवृष्टीचा कहर दिसून येतोय मनाली, डलहौसी, किन्नौर, लाहौल स्पिती भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होतेय. रस्ते, डोंगर, दऱ्या, घरं दुकानं सारं काही बर्फाने व्यापून गेलं आहे. कुल्लू, शिमला भागात बर्फवृष्टीचा नजारा पाहण्याजोगा आहे. 

6/7

Winter Vibes : ये हसीं वादियां.... ये खुला आसमां...

मनालीमध्ये तापमानाने उणे १ इतका आकडा गाठला आहे. डिसेंबर महिन्यात पहिली बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही खुशखबर ठरतेय.

7/7

Winter Vibes : ये हसीं वादियां.... ये खुला आसमां...

गेल्या काही दिवसांपासून देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. उत्तराखंड ते हिमाचल प्रदेश आणि लेह-लडाख ते जम्मू काश्मीर-श्रीनगरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सुरु आहे. सध्याच्या घडीला सुरु असणारी बर्फवृष्टी पाहता थंडीचा थर्ड डिग्री अटॅक सुरु आहे, असं म्हणायला हरकत नाही. (सर्व छायाचित्रे- एएनआय/ ट्विटर)