close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

महिलांना त्यांच्या स्वप्नांचे बलिदान द्यावे लागते - सोनाक्षी

'दबंग' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारी बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अनेक खुलासे केले आहेत. 

Apr 15, 2019, 11:23 AM IST

मुंबई : 'दबंग' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारी बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अनेक खुलासे केले आहेत. आजची महिला स्त्रि सशक्तीकरण मोठ्या उत्साहाने साजरा करते. पण अजुनही काही भागात महिलांना त्यांच्या विचारांचे स्वप्नांचे बलिदान द्यावे लागते. येत्या १७ तारखेला सोनाक्षीचा 'कलंक' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. अनेक दिग्गज कलाकारांची मेजवानी 'कलंक' चित्रपटात अनुभवता येणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तिने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवरून पडदा उचलला आहे. पदरात पैसा आणि प्रसिद्धी आली की व्यक्ती हवेत उडतो असे म्हणतात, पण कुटुंब आणि मित्रांनी मला नेहमी जमीनीवर रहायला शिकवलं असल्याचे सोनाक्षीचे म्हणणे आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला की, चंदेरी दुनीयाच्या झगमटापासुन दूर तू नेहमी खूश असतेस? त्यावर सोनाक्षी म्हणाली, 'मला ज्या गोष्टीवर जास्त प्रेम आहे तेच मी करते. माझ्यासाठी प्रत्येक चित्रपट हा माझा पहिला चित्रपट असतो. मी माझी भूमिका प्रमाणिक पणे पार पाडते. त्यापेक्षा जास्त मी ती भूमिका जगते.'

1/6

2/6

हाजीहाजी करणाऱ्या लोकांपासून दूर राहा..

कधीही सत्यासह बांधील असायला हवं. हाजीहाजी करणाऱ्या लोकांपासून दूर राहणं आपल्या आयुष्यासाठी योग्य आहे. आपली माणसं आपल्याला प्रेम त्याचबरोबर आपल्या कामावर टीका सुद्धा करतात. 

3/6

हे वर्ष माझ्यासाठी आनंददायी...

माझ्यासाठी हे वर्ष अत्यंत उत्साहपूर्ण आहे. 'कलंक' माझा या वर्षाचा पहिला चित्रपट आहे. त्यानंतर माझे तीन चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहेत. बाकी चार चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.   

4/6

'कलंक' चित्रपटात साकारणार भूमिका..

मल्टी स्टारर चित्रपट 'कलंक'मध्ये सोनाक्षी मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्या व्यतिरिक्त चित्रपटात आलिया भट्ट, वरूण धवण, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य राय कपूर झळकणार आहे.   

5/6

१९४० च्या काळात फिरतोय चित्रपट

सोनाक्षीला विचारण्यात आले, 'त्या काळच्या महिलांचे जीवन आणि आताच्या महिलांच्या जीवनामध्ये काय विभिन्नता जाणवते, तेव्हा सोनाक्षी म्हणाली 'आधुनिक युगात महिलांच्या जीवनात अनेक बदल झले आहेत पण आणखी बदलाची गरज आहे.'

6/6

महिला सशक्तीकरणावर काय म्हणाली सोनाक्षी

वर्तमानकाळात जेव्हा आपण महिला सशक्तीकरण उत्साहाने साजरा करतो, तेव्हा दुसरीकडे परंपरेने ग्रासलेल्या भागात आजही महिलांना आपल्या स्वप्नांचे पंख कापावे लागतात. (छाया सौजन्य- सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम अकाउंट)