787 फूट खोल, समुद्राखालून रेल्वे प्रवास... कसा आहे मार्ग? कुठे आहेत स्थानकं?

Deepest Rail Tunnel:  आता चक्क समुद्राखाली जाऊन पकडता येणार ट्रेन? रेल्वेचा वेग ताशी 320 किमी... कुठे साकारला जातोय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प?   

Sayali Patil | Oct 12, 2025, 02:00 PM IST
twitter

 

 

1/8

बुलेट ट्रेन

world longest underwater tunnel railway station japan news

Longest and Deepest Rail Tunnel: परदेशांमध्ये बुलेट ट्रेन ही संकल्पना आता सामान्य झाली असली तरीही भारतासाठी मात्र अद्यापही हा कुतूहलाचाच विषय ठरत आहे. ज्या वेगानं भारतीय बुलेट ट्रेनचा प्रवास सुरू आहे चो वेग पाहता निर्धारित वेळात देशात ही सेवा सुरू होणार हे निश्चित. 

twitter
2/8

जपानी तंत्रज्ञान

world longest underwater tunnel railway station japan news

जपानी तंत्रज्ञानावर आधारित बुलेट ट्रेन भारतात तयार होत असून, त्यासाठी जपानचीच मदत घेतली जात आहे. या रेल्वेचा ताशी वेग 320 किमी असून, ती 508 किमीचं अंतर अवघ्या 2 तासांच ओलांडणार आहे. भारतातील या बुलेट ट्रेनचा मार्ग जमीन, समुद्र आणि उंचवट्याच्या भागांमधून जाणार आहे. 

twitter
3/8

पाण्याखालून ट्रेन

world longest underwater tunnel railway station japan news

रेल्वे मार्गाअंतर्गत 508 किमीच्या मार्गिकेपैकी 23.3 किमी मार्ग समुद्रातून जाणार असून, पाण्याखालून ही ट्रेन अतिप्रचंड वेगानं धावणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2027 ला तयार होऊ शकतो. 

twitter
4/8

प्रकल्पाच्या पूर्ततेस काही वर्षं

world longest underwater tunnel railway station japan news

भारतातील या प्रकल्पाच्या पूर्ततेस काही वर्षं जाणार असली तरीही एक ठिकाण असं आहे जिथं मात्र आधीच समुद्राखालून रेल्वेप्रवास करता येणार आहे. हे स्वप्न साकार होईल जपानमध्ये. जपानमध्ये बुलेट ट्रेन 23 किमीचं अंतर हे समुद्राखालीलल मार्गिकेवरून ओलांडते. जगातील आतापर्यंतचा सर्वात लांब आणि खोल बुलेट ट्रेन बोगदा जपानमध्ये तयार करण्यात आला आहे.   

twitter
5/8

साइकेन टनल

world longest underwater tunnel railway station japan news

साइकेन टनल असं या बोगद्याचं नाव असून, तो हॉन्शू बेटाला होक्काईडोशी जोडतो. त्सुगारू स्ट्रेट समुद्रातील खाडी परिसरातून हा बोगदा पुढे जातो. ज्याची लांबी 53.85 किमी इतकी आहे. हा बोगदा फक्त लांब नाही, तर खोलसुद्धा आहे. शिंकानसेन रेल्वेंसाठी तयार करण्यात आलेला हा बोगदा अभियांत्रिकी कौशल्याचं एक उत्तम उदाहरण असून, लांबी आणि खोलीसाठी तो ओळखला जातो. 

twitter
6/8

बोगद्याची खोली

world longest underwater tunnel railway station japan news

या बोगद्याची खोली साधारण 25 मजली इमारतीइतकी असून, त्यातून प्रवास करणं किती थरारक असेल याच्या कल्पनेनंच अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. 

twitter
7/8

आश्चर्याची बाब

world longest underwater tunnel railway station japan news

आश्चर्याची बाब म्हणजे हा बोगदा तयार करण्यासाठीची योजना 1954 मध्ये आखण्यात आली होती. ज्यासाठी प्रथम 5 किमीचा पायलट टनल बनवण्यात आला होता. पुढे 1985 मध्ये हा मुख्य बोगदा तयार झाला. 

twitter
8/8

दोन स्थानकं

world longest underwater tunnel railway station japan news

हा बोगदा तयार करण्यासाठी 1.1 ट्रिलियन येन अर्थात 7 बिलियन डॉलर इतका खर्च आला. भूकंप आणि त्सुनामी यांसारख्या आपत्तींपासून सुरक्षित राहील अशीच या बोगद्याची बांधणी करण्यात आली. या रेल्वे बोगद्यासोबतच समुद्राखातील दोन स्थानकं असून, तप्पी काईतोई आणि योईची अशी या स्थानकांची नावं आहेत. ही स्थानकं फक्त पर्यटकांसाठीच असून, तिथं ते रेल्वेतून उतरून या परिसरात फेरफटका मारू शकतात.   

twitter