close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

यामीचा ग्लॅमरस अंदाज व्हायरल होताच 'या' चर्चांना उधाण

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री यामी गौतम तिच्या आगामी 'बाला' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Jun 25, 2019, 16:31 PM IST

मुंबई : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री यामी गौतम तिच्या आगामी 'बाला' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. मॉडलिंगच्या जगातून अभिनयाकडे वळलेल्या यामीला मॉडलिंग क्षेत्रातील बारकाव्यांच्या अनुभवाचा फायदा 'बाला' चित्रपटात झाला आहे. ती चित्रपटात एका मॉडेलची भूमिका साकारताना दिसणार आहे. ती म्हणते की, 'मी लखनऊ मधल्या एका स्थानीक मॉडेलच्या भूमिकेत चित्रपटात झळकणार आहे. माझ्या शहरातील मी अत्यंत लोकप्रिय व्यक्तीमत्व आहे. चित्रपटात माझी भूमिका इतरांपेक्षा वेगळी आहे.' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिनेश विजन यांच्या खांद्यावर आहे. त्याचप्रमाणे 'बदलापूर' चित्रपटानंतर हे दोघे एकत्र काम करणार आहेत.

1/5

आयुष्मान खुरानासह करणार स्क्रिन शेअर

आयुष्मान खुरानासह करणार स्क्रिन शेअर

'बाला' चित्रपटात यामी गौतम शिवाय अभिनेता आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर सुद्धा झळकणार आहेत.  

2/5

हारूनच्या चित्रपटात साकारणार व्यक्तीरेखा

हारूनच्या चित्रपटात साकारणार व्यक्तीरेखा

प्रसिद्ध दिग्दर्शक अजीज मिर्जा यांचा मुलगा हारूनच्या चित्रपटात देखील यामीची वर्णी लागली आहे. हारूनच्या चित्रपटात ती अभिनेता दिलजीत दोसांझ सोबत झळकणार आहे.  

3/5

चित्रीकरणाची सुरूवात

चित्रीकरणाची सुरूवात

चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरूवात ऑगस्ट महिन्यात होणार आहे. 

4/5

यामीची वाढती लोकप्रियता

यामीची वाढती लोकप्रियता

यामीने 'विक्की डोनर' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने आयुष्मान खुरानासह स्क्रिन शेअर केली होती.   

5/5

ह्रतिकसह शेअर केली स्क्रिन

ह्रतिकसह शेअर केली स्क्रिन

यामीची लोकप्रियता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अभिनेता ह्रतिक रोशनसह ती 'काबील' चित्रपटात झळकली होती.