सुरु करा LED बल्ब बनवण्याचा व्यवसाय; बक्कळ कमाईची संधी

देशात एलईडी बल्ब बनवण्याची मागणी वाढत आहे. एलईडी बल्बमधून अधिक उर्जा आणि प्रकाश मिळतो.

Jan 13, 2020, 13:55 PM IST

एलईडी म्हणजेच... Light Emitting Diode 

1/7

विशेष बाब म्हणजे, एलईडी बल्बला रिसायकल (recycled) करता येऊ शकतं. एलईडीमध्ये सीएफएल (CFL) बल्बप्रमाणे पारा (mercury) नसतो. पण यात लेड (lead) आणि निकल  (Nickel) सारखे घटक असतात.

2/7

एलईडी (LED) बल्ब सीएफएलच्या तुलनेत कमी उर्जा वापरते. LED बल्ब CFLच्या तुलनेत महागही असतो.  

3/7

LED बल्ब जवळपास ५० हजार तास किंवा त्याहूनही अधिक चालू शकतो. तर CFL बल्ब ८ हजार तास चालू शकतो. LED बल्ब टिकाऊ आणि अधिक काळ टिकणारा आहे.

4/7

अशातच, जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर LED बल्बचा व्यवसाय सुरु करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल आणि मीडियम इंटरप्राइजेसअंतर्गत (Ministry of Micro, Small and Medium Enterprises) अनेक संस्था LED बल्ब बनवण्याचं ट्रेनिंग देत आहेत. 

5/7

दिल्लीत पश्चिम विहार (Paschim Vihar) येथील भारती विद्यापीठात LED बल्ब बनवण्याचा कोर्स उपलब्ध आहे. जवळपास ५ हजार रुपये इतकी या कोर्ससाठी फी आहे. या कोर्सदरम्यान, LED बल्बबाबत अनेक गोष्टी, बारकावे यांची माहिती देण्यात येते. LED बल्ब बनवण्याच्या पद्धतीही शिकवल्या जातात.  

6/7

LED बल्ब बनवण्याच्या ट्रेनिंगमध्ये बेसिक ऑफ एलईडी, बेसिक ऑफ पीसीबी, एलईडी ड्रायव्हर, फिटिंग-टेस्टिंग, मटेरियल खरेदी, मार्केटिंग, सरकारी सब्सिडी स्किम याबाबत आणि इतरही गोष्टींबाबत माहिती दिली जाते.

7/7

ट्रेनिंग घेतल्यानंतर LED बल्ब बनवण्याचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास, 99711-2866, 82175-82663 किंवा 88066-14948 या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.