अंबानींच्या शाळेतून शिक्षण, तब्बल 12 यूट्यूब चॅनलचा मालक, Youtuber रणवीर अल्लाहबादियाची संपत्ती पाहून डोळे फिरतील
Ranveer Allahbadia Net Worth : प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया त्याच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील एका नव्या एपिसोडमध्ये त्याने केलेल्या एका अश्लील प्रश्नावरून तो सध्या ट्रोल होतोय. एवढंच नाही तर त्याच्या विरुद्ध FIR सुद्धा रजिस्टर करण्यात आलंय. रणवीर अल्लाहबादिया हा त्याच्या पॉडकास्टमध्ये व्यवसाय, खेळ, मनोरंजन इत्यादी अनेक क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती घेताना दिसतो. युट्यूबवर तब्बल 12 चॅनल असणाऱ्या रणवीर अल्लाहबादियाची एकूण संपत्ती किती याबाबत माहिती जाणून घेऊयात.

कॉमेडियन समय रैनाच्या शोमधील एका स्पर्धकाला रणवीरने एक वादग्रस्त आणि अश्लील प्रश्न विचारला. यात त्याने सांगितले की, 'तुम्ही संपूर्ण आयुष्यात प्रत्येक दिवशी तुमच्या पालकांना इंटिमेट होताना पाहू इच्छिता की एकदा त्यांना जॉईन करू इच्छिता? या प्रश्नानंतर सोशल मीडियावर रणवीरला खूप ट्रोल केलं जातं आहे. तसेच यामुळे त्याच्या विरुद्ध FIR सुद्धा रजिस्टर करण्यात आलंय.




