युजवेंद्र चहलने धनश्रीला साडे चार कोटी पोटगी दिल्यानंतर दोघांकडे किती राहणार संपत्ती? कोण जास्त श्रीमंत?

धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये दिल्यानंतर युजवेंद्र चहलची एकूण संपत्ती राहील? धनश्री वर्माकडे किती संपत्ती आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Mar 20, 2025, 09:36 PM IST

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Networth: धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये दिल्यानंतर युजवेंद्र चहलची एकूण संपत्ती राहील? धनश्री वर्माकडे किती संपत्ती आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1/11

युजवेंद्र चहलने धनश्रीला साडे चार कोटी पोटगी दिल्यानंतर दोघांकडे किती राहणार संपत्ती? कोण जास्त श्रीमंत?

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Networth: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर  आजकाल युजवेंद्र घटस्फोटाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. युजवेंद्रने ५ फेब्रुवारी रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

2/11

कोणाकडे किती संपत्ती आहे?

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये देणार आहे. पण धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये दिल्यानंतर युजवेंद्र चहलची एकूण संपत्ती राहील? धनश्री वर्माकडे किती संपत्ती आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

3/11

22 डिसेंबर 2020 रोजी लग्न

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचे 22 डिसेंबर 2020 रोजी लग्न झाले. पण गेल्या काही काळापासून दोघेही वेगळे होत आहेत. युजवेंद्रने आतापर्यंत धनश्रीला पोटगी म्हणून 2.37 कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित पैसे चहलला द्यायचे आहेत.

4/11

उत्पन्नाचे मुख्य स्रोत

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

युजवेंद्र चहलची एकूण मालमत्ता सुमारे 45 कोटी रुपये आहे. तभारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), इंडियन प्रीमियर लीग (IPL), जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न आणि त्याची गुंतवणूक हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.

5/11

आयपीएलमधून कमाई

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

युजवेंद्रचा बीसीसीआयसोबत ग्रेड सी करार आहे. या कराराच्या बदल्यात त्याला दरवर्षी 1 कोटी रुपये मिळतात. आयपीएलमध्ये त्याला खूप मागणी असून त्यात तो चांगले पैसे कमावतो. आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जने त्याला 18 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आतापर्यंत त्याने आयपीएलमधून सुमारे 37 कोटी रुपये कमावले आहेत.

6/11

आलिशान घर, ब्रँड एंडोर्समेंट

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

युजवेंद्र चहल केवळ क्रिकेटमधूनच नाही तर जाहिरातींमधूनही खूप कमाई करतो. तो Vivo, Nike, Acuvue, Boom 11 आणि Fanta सारख्या मोठ्या ब्रँडसाठी जाहिराती करतो. याशिवाय, हरियाणातील गुरुग्राममध्ये त्याचे एक आलिशान घर आहे. त्याला महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्याच्या लक्झरी गाड्यांच्या ताफ्यात पोर्श केयेन एस आणि मर्सिडीज-बेंझ सी-क्लासचा समावेश आहे.

7/11

धनश्रीकडे किती संपत्ती?

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

27 सप्टेंबर 1996 रोजी दुबईमध्ये जन्मलेल्या धनश्रीने वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे आणि ती दंतचिकित्सकदेखील आहे. धनश्री एक इन्फ्लूएन्सर, युट्यूबर आणि कोरिओग्राफर आहे. दुबईमध्ये जन्मलेली धनश्री मुंबईत वाढली. 

8/11

धनश्रीचे शिक्षण

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

धनश्रीने तिचे शालेय शिक्षण जमनाबाई नरसी इंटरनॅशनल स्कूलमधून केले आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी धनश्री विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजमध्ये गेली. दंतचिकित्सक असूनही, धनश्रीला नृत्याची खूप आवड होती. धनश्रीला पहिल्यांदा तिच्या यूट्यूब डान्स व्हिडिओंमुळे ओळख मिळाली.

9/11

सोशल मीडियात सक्रीय

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

धनश्रीचे यूट्यूबवर 2.79 दशलक्ष सबस्क्राइबर आहेत.  धनश्रीने इंस्टाग्रामवर तिचे नृत्य कौशल्य दाखवले. धनश्रीला इंस्टाग्रामवर 6.3 दशलक्ष चाहते फॉलो करतात. धनश्री सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत राहते.

10/11

धनश्रीची संपत्ती

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

धनश्रीची एकूण संपत्ती 24 ते 26 कोटी रुपये आहे.नृत्यदिग्दर्शनाव्यतिरिक्त, धनश्री ब्रँड एंडोर्समेंट, सोशल मीडिया प्रमोशन आणि जाहिरातींमधून देखील कमाई करते. धनश्रीची स्वतःची नृत्य अकादमी आहे. जिथून ती चांगली कमाई करते. धनश्रीने झलक दिखला जा सीझन 11 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणूनही भाग घेतला होता.

11/11

धनश्रीचा म्युझिक अल्बम

Yuzvendra Chahal and Dhanashree verma Net Worth Who is more richer Marathi News

20 मार्च रोजी धनश्रीचा 'देखा जी देख मैं' हा म्युझिक अल्बम रिलीज झाला. याआधी ती पंजाबी स्टार गिप्पी ग्रेवालसोबत जुट्टी कसुरी या गाण्यात दिसली होती. याशिवाय तिने बाबू की बेबी या गाण्यात काम केले आहे.