आसावरी - अभिजितच्या हळदीचे खास फोटो

सध्या झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' मालिका चर्चेत आहे. मालिकेला चाहत्यांची चांगलीच पसंतीही मिळतेय. 

Jan 17, 2020, 13:58 PM IST

मालिकेची एक वेगळीच कथा, मालिकेत दाखवण्यात आलेलं कौटुंबिक वातावरण, मित्र-परिवार सर्वच गोष्टी या 'अग्गंबाई सासूबाई'च्या जमेच्या बाजू ठरत आहेत. 

1/8

'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आता मालिकेने एक वेगळं वळणं घेतलं आहे. आजोबांनी आसावरी आणि अभिजित यांच्या लग्नासाठी परवानगी दिली. (फोटो सौजन्य - झी मराठी / ट्विटर)

2/8

लग्नासाठी परवानगी दिल्यानंतर आपल्या सासूबाईंसोबत नेहमी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या शुभ्राने लग्नाच्या तयारीला सुरुवात केलीय. (फोटो सौजन्य - झी मराठी / ट्विटर)

3/8

आता मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना आसावरी आणि अभिजितच्या हळदीचा समारंभ पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य - झी मराठी / फेसबुक)

4/8

लग्नासाठी मिळालेल्या आजोबांच्या परवानगीनंतर, घरात आनंदाचं वातावरण आहे. (फोटो सौजन्य - झी मराठी / फेसबुक)

5/8

हळदीसाठी घातलेल्या संपूर्ण दागिन्यांमध्ये आसावरीचं सौंदर्य अधिकच खुललंय...(फोटो सौजन्य - झी मराठी / ट्विटर)

6/8

अभिजितला मिळणार त्याच्या हक्काचा जोडीदार...(फोटो सौजन्य - झी मराठी / ट्विटर)

7/8

सासूच्या लग्नासाठी सूनेची लगीनघाई...(फोटो सौजन्य - झी मराठी / ट्विटर)

8/8

'अग्गंबाई सासूबाई'च्या सेटवरील आसावरी-अभिजितच्या हळदीची काही खास क्षणचित्रं... (फोटो सौजन्य - झी मराठी / फेसबुक)