पुण्यात कोकणचा हापूस आंबा दाखल; एका पेटीचा दर पाहून शॉक व्हाल!

पुण्यात कोकणचा हापूस आंबा दाखल झाला आहे.  यंदा जानेवारी महिन्यात आंबा बाजारात आला आहे. या पहिल्या पेटीला विक्रमी दर मिळाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 24, 2026, 08:55 PM IST
पुण्यात कोकणचा हापूस आंबा दाखल; एका पेटीचा दर पाहून शॉक व्हाल!

Pune Hapus Mango : जगभरात कोकणच्या हापूस आंब्याला मोठी मागणी असते. आब्यांचा सिजन मार्च महिन्यात सुरु होतो. यंदा मात्र, जानेवारी महिन्यातच आंबा बाजारात आला आहे. पुण्यात हापूस आंबा दाखल झाला आहे. प्रत्येक पेटीला 15 हजारांचा भाव मिळत आहे.  कोकणातील विविध भागातून सध्या हापूस आंब्याची आवक सुरू झालीय. तसेच केशर आंब्याचीही पहिली आवक झाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवडीचा असलेला अंबा बाजारात दाखल होऊ लागला आहे कोकणातील विविध भागातून सध्या हापूस आंब्याची तुलक आवक सुरू झाली आहे. फेब्रुवारीच्या 15 ते 20 तारखे दरम्यान हापूसच्या व सुरू होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे रत्नागिरी हापूस व केशरची यावर्षीची पहिली आवक झाली. 

रत्नागिरी येथील जलाल काझी जैतापूर रत्नागिरी येथून ही आवक झाली. यामध्ये दोन हापूसची पेटी आणि दोन पेटी केशर आंबा आहे.  सुधीर बबनराव मनसुख या व्यापाऱ्याकडे हा आंबा विक्रीसाठी आला आहे.  आंबा उत्तम प्रतीचा आहे. या वर्षाच्या सर्वात उचांकी भाव म्हणजेच प्रति पेटी 15,000 रुपये भाव आंब्याला मिळाला. ही खरेदी बाजारातील युवराज काची यांनी केली. यावेळी खरेदीसाठी बाजार समितीचे संचालक गणेश घुले तसेच फळ विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे दादासाहेब बांदल अडते अजय वाखारे नाना मस्के शरदशेठ कुंजीर युवराज काची प्रकाश भडकुंबे प्रीतम परदेशी बालाजी राठोडे हुसेन मणियार नाना राठोडे हनुमंत शिवरे आधी जण उपस्थित होते.

आरा फायर क्रंच  नव्या जागतिक द्राक्षवाणची यशस्वी लागवड

द्राक्ष उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या सांगलीच्या पलूस तालुक्यात आरा फायर क्रंच चा नवा जागतिक द्राक्षवाण यशस्वी लागवड करण्यात आली आहे.
आमणापूर येथील बोरजाईनगरच्या माळी कुटुंबाने शेतीत एक नवा इतिहास घडवला आहे. माळी कुटुंबाने तालुक्यातील ''''आरा फायर क्रंच'''' या नवीन जागतिक द्राक्ष वाणाचा पहिलाच यशस्वी प्लॉट फुलवला असून सध्या या बागेची काढणी मोठ्या उत्साहात सुरू आहे. या प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष या बागेकडे वेधले गेले आहे. ''''आरा फायर क्रंच'''' हा वाण आपल्या गडद लाल आकर्षक रंगासाठी आणि अतिशय कुरकुरीत चवीसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या या वाणाचे सध्या दोन एकर क्षेत्रातून पहिले पीक घेतले जात असून, या यशाने प्रोत्साहित होऊन माळी कुटुंबाने आणखी तीन एकरवर नवीन प्लांटेशन देखील केले आहे. हा वाण प्रामुख्याने कॅलिफोर्नियामध्ये विकसित करण्यात आला असून, भारतात सह्याद्री फार्म्स सारख्या संस्थांच्या माध्यमातून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More