)
केतन अगरवाल हत्या प्रकरणामधील आरोपी सिया गोयलचे वकिलांनी मंगळवारी सियासंदर्भात समोर आलेली एक बातमी फेटाळून लावली आहे. सिया आणि तिचा प्रियकर व या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच लग्न केलं होतं असा दावा काही प्रसारमाध्यमांनी केल्यानंतर सियाच्या वकिलांनी ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचं म्हटलं आहे.
सियाचे वकील विपुल दुशिंग यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये, "सिया आणि चेतन यांच्या लग्नासंदर्भातील बातम्या आणि लेख अनेक वृत्तपत्रांनी छापले आहेत. मात्र या दाव्याला पाठबळ देणाऱ्या कोणत्याही गोष्टी उपलब्ध नाहीत. हे दावे बिनबुडाचे आहेत," असं म्हटलं आहे. यापूर्वी आलेल्या बातम्यांमध्ये सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना लपूनछपून चार महिन्यांपूर्वीच लग्न केलं होतं असा दावा करण्यात आला होता. या दोघांनीही गुपचूप उरलकलेलं हे लग्न घरच्यांपासून लपवून ठेवलं होतं.
25 वर्षीय केतनला 18 जून रोजी लोहगडावरुन धक्का देऊन ठार मारल्याचा आरोप 20 वर्षीय सिया आणि 22 वर्षीय चेतनवर आहे. सिया आणि केतनचं लग्न ठरलं होतं. दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र सियाला केतनबरोबर लग्न करायचं नव्हतं. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोयल आणि अगरवाल कुटुंबाने दोघांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं होतं.
दरम्यान, सियाने मैत्रिणींच्या स्नॅपचॅट ग्रुपवर लग्नाच्या तिकीटांसंदर्भात बोलताना केतनसोबत माझं लग्न होणार तर नाहीये, असं म्हटलं होतं. हा मेसेज सियाने मे महिन्यामध्ये पाठवला होता. केतनची हत्या करण्याआधीच सियाने अगदी ठामपणे हा मेसेज पाठवला असल्याने तिने आधीपासून केतनला संपवण्याचा डाव आखला होता का याचा तपास आता केला जात आहे.
तुरुंगातही श्रीमंती... सिया आजही वापरतेय फॉरेन ब्रँडचे कपडे; शर्टची किंमत अनेकांच्या मासिक पगारपेक्षाही जास्तhttps://t.co/bp8RtIhwZH < येथे वाचा सविस्तर वृत्त...#ketanAgarwal #siyagoyal #pune #police #arrest #price #sweatshirt #french #brand
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 7, 2026
सियाने केतनला मारण्याचा कट रचण्यापूर्वी बरीच माहिती गोळा केली होती. हिमाचल प्रदेशमधील डोंगरावरुन नवऱ्याला धक्का देऊन मारण्याऱ्या सोनम सूर्यवंशीसंदर्भातील माहिती सियाने गुगलवर सर्च केली होती. महिलांसोबत तुरुंगात कसं वागतात, तसेच सोनम सुर्यवंशी प्रकरणातील बारकावे यासारख्या गोष्टी सियाने गुगलवरुन सर्च केल्याची माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस आता तांत्रिक डेटाबरोबरच परिस्थितीजन्य पुरावे आणि अधिक माहिती गोळा करत आहे. शुक्रवारी वडगाव कोर्टाने सिया आणि चेतन या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अगदी सियाला तिच्या घरी नेऊनही तपास केला आहे.