... आणि टीम इंडिया बनली चॅम्पियन

Sep 20, 2012, 15:31 PM IST
1/6

फायनल : भारत विरुद्ध पाकिस्तान (थरारक विजय)फायनलमध्ये भारतासमोर पाकिस्तान पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघ म्हणून उभा राहिला होता. पण, लीग मॅचेसमध्ये पाकला धूळ चारल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला होता. धोनीनं पुन्हा एकदा टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग स्वीकारली. युसूफ पठाण आणि गौतम गंभीर ओपनर्स म्हणून पुढे सरसावले. दोघांनी केवळ २.४ ओव्हरमध्ये २५ रन्स उभारले. त्यानंतर पठाण बाद झाला. रॉबिन उथप्पा (८) तर युवराज सिंगही (१४) लागोपाठ आऊट झाले. गंभीर मात्र मैदानावर टीकून राहिला होता. मात्र, उमर गूलनं त्याला १८ व्या ओव्हरला टीपलाच. रोहित शर्मानं १६ बॉलमध्ये ३० रन्स ठोकले आणि भारताचा खेळ १५७ रन्सवर थांबला. आर. पी. सिंगनं त्याच्या खेळाची जादू पुन्हा चालवली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद हाफिजला नेमकं टीपलं. त्यानंतर आलेल्या इमरान नझीरनं टीम इंडियाला चांगलंच चकवलं. पण १४ बॉल्समध्ये ३३ रन्स काढून तो रन आऊट झाला. मधल्या फळीतील बॅटसमनही काही कमाल दाखवू शकले नाही. युनिस खान, शोएब मलिक आणि आफ्रिदी लागोपाठ आऊट झाले. १०४/७ अशी पाकिस्तानची अवस्था असताना टीम इंडियाला आपला विजय समोर दिसत होता. केवळ ४ ओव्हरमध्ये पाकिस्तानला आवश्यकता होती तब्बल ५४ रन्सची... आणि अचानक हरभजनच्या ओव्हरवर मिसबाह उल हकनं तीन सिक्स लगावले. खेळाचा चेहरा बदलायला लागला होता आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे हावभावही... आता शेवटची ओव्हर उरली होती आणि पाकिस्तानला गरज होती १३ रन्सची... आणि श्रीसंतनं मिसबाहची कॅच झेलली... आणि... जल्लोष, जल्लोष, जल्लोष.... भारतानं टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली होती.

फायनल : भारत विरुद्ध पाकिस्तान (थरारक विजय)
फायनलमध्ये भारतासमोर पाकिस्तान पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघ म्हणून उभा राहिला होता. पण, लीग मॅचेसमध्ये पाकला धूळ चारल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला होता. धोनीनं पुन्हा एकदा टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग स्वीकारली.

युसूफ पठाण आणि गौतम गंभीर ओपनर्स म्हणून पुढे सरसावले. दोघांनी केवळ २.४ ओव्हरमध्ये २५ रन्स उभारले. त्यानंतर पठाण बाद झाला. रॉबिन उथप्पा (८) तर युवराज सिंगही (१४) लागोपाठ आऊट झाले. गंभीर मात्र मैदानावर टीकून राहिला होता. मात्र, उमर गूलनं त्याला १८ व्या ओव्हरला टीपलाच. रोहित शर्मानं १६ बॉलमध्ये ३० रन्स ठोकले आणि भारताचा खेळ १५७ रन्सवर थांबला.

आर. पी. सिंगनं त्याच्या खेळाची जादू पुन्हा चालवली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद हाफिजला नेमकं टीपलं. त्यानंतर आलेल्या इमरान नझीरनं टीम इंडियाला चांगलंच चकवलं. पण १४ बॉल्समध्ये ३३ रन्स काढून तो रन आऊट झाला. मधल्या फळीतील बॅटसमनही काही कमाल दाखवू शकले नाही. युनिस खान, शोएब मलिक आणि आफ्रिदी लागोपाठ आऊट झाले. १०४/७ अशी पाकिस्तानची अवस्था असताना टीम इंडियाला आपला विजय समोर दिसत होता. केवळ ४ ओव्हरमध्ये पाकिस्तानला आवश्यकता होती तब्बल ५४ रन्सची...

आणि अचानक हरभजनच्या ओव्हरवर मिसबाह उल हकनं तीन सिक्स लगावले. खेळाचा चेहरा बदलायला लागला होता आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे हावभावही... आता शेवटची ओव्हर उरली होती आणि पाकिस्तानला गरज होती १३ रन्सची... आणि श्रीसंतनं मिसबाहची कॅच झेलली... आणि... जल्लोष, जल्लोष, जल्लोष.... भारतानं टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली होती.

2/6

दुसरी सेमीफायनल : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (भारताचा १५ रन्सनं विजय)ही टूर्नामेंटमधली दुसरी सेमीफायनल होती आणि या मॅचमध्येही धोनीनं पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. जॉनसननं सेहवाग (९) आणि गंभीरला (२४) आऊट केल्यानंतर आलेल्या युवराज आणि रॉबिन उथप्पानं मात्र ८४ रन्सची खेळी केली. यावेळी मैदानात उतरलेला युवराजही अनेकांच्या आजही लक्षात आहे. या मॅचमध्ये त्यानं अवघ्या ३० बॉल्समध्य ७० रन्स ठोकले होते. ब्रेट लीच्या एका बॉलला तर त्यानं ११९ मीटर लांब उडवून सीक्स लगावला. धोनीनंही २१ बॉल्समध्ये ३६ रन्स काढले. शेवटपर्यंत भारतानं १८८ रन्स उभारले होते.  प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गीलख्रिस्ट आणि हेडननं ३६ रन्सची पार्टनरशीप केली अन् पहिली विकेट उडाली. ब्रॅड होडग् आणि सायमंडसनं ३२ रन्स जमा केले. पठाणनं ११ रन्सवर होडगला टीपलं तर भारतासाठी धोकादायक दिसत असलेला अॅन्ड्र्यू सायमंडही (२६ बॉल्समध्ये ४३ रन्स) १७ व्या ओव्हरला आऊट झाला. मायकेल क्लर्कलाही ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांचं ओझं सांभाळता आलं नाही आणि भारताचा पुन्हा एकदा विजय झाला. टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली होती आणि इथं परत एकदा त्यांची गाठ पडली पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर...

दुसरी सेमीफायनल : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (भारताचा १५ रन्सनं विजय)
ही टूर्नामेंटमधली दुसरी सेमीफायनल होती आणि या मॅचमध्येही धोनीनं पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. जॉनसननं सेहवाग (९) आणि गंभीरला (२४) आऊट केल्यानंतर आलेल्या युवराज आणि रॉबिन उथप्पानं मात्र ८४ रन्सची खेळी केली. यावेळी मैदानात उतरलेला युवराजही अनेकांच्या आजही लक्षात आहे. या मॅचमध्ये त्यानं अवघ्या ३० बॉल्समध्य ७० रन्स ठोकले होते. ब्रेट लीच्या एका बॉलला तर त्यानं ११९ मीटर लांब उडवून सीक्स लगावला. धोनीनंही २१ बॉल्समध्ये ३६ रन्स काढले. शेवटपर्यंत भारतानं १८८ रन्स उभारले होते.

प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गीलख्रिस्ट आणि हेडननं ३६ रन्सची पार्टनरशीप केली अन् पहिली विकेट उडाली. ब्रॅड होडग् आणि सायमंडसनं ३२ रन्स जमा केले. पठाणनं ११ रन्सवर होडगला टीपलं तर भारतासाठी धोकादायक दिसत असलेला अॅन्ड्र्यू सायमंडही (२६ बॉल्समध्ये ४३ रन्स) १७ व्या ओव्हरला आऊट झाला. मायकेल क्लर्कलाही ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांचं ओझं सांभाळता आलं नाही आणि भारताचा पुन्हा एकदा विजय झाला. टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली होती आणि इथं परत एकदा त्यांची गाठ पडली पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर...

3/6

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (भारताचा ३७ रन्सनं विजय)धोनीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा पर्याय स्वीकारला. पण, हा निर्णय थोडा चुकीचा ठरला कारण भारतानं केवळ ६१ रन्समध्ये ४ विकेट गमावल्या होत्या. यावेळी रोहीत शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीनं परिस्थिती सावरली आणि दोघांनी ८५ रन्सची भागेदारी केली. रोहीतनं ४० बॉल्समध्ये ५० रन्स ठोकले. पण, धोनी मात्र शेवटच्या ओव्हरला रन आऊट झाला. त्यानं ३३ बॉल्समध्ये ४५ रन्स केले होते. भारतानं १५४ रन्सचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभं केलं होतं.आर. पी. सिंगनं द. आफ्रिकेच्या दोन्ही ओपनर्सला अचूक टीपलं. हर्षल गीब्स एलबीडब्ल्यू झाला तर ग्रॅहम स्मिथची कॅच दिनेश कार्तिकनं घेतली. द. आफ्रिकेची मधली फळी गारद झाली होती. इतरही काही कमाल दाखवू शकले नाहीत. मार्क बाऊचरनं ४१ बॉल्समध्ये ३६ रन्स तर अल्बे मॉरकेलनं ३७ बॉल्समध्य ३६ रन्स दिले.  आणि भारतानं ही मॅच ३७ रन्सच्या फरकानं घशात घातली आणि द. आफ्रिका टूर्नामेंटमधून बाद झाली. या विजयाबरोबर भारतानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (भारताचा ३७ रन्सनं विजय)
धोनीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा पर्याय स्वीकारला. पण, हा निर्णय थोडा चुकीचा ठरला कारण भारतानं केवळ ६१ रन्समध्ये ४ विकेट गमावल्या होत्या. यावेळी रोहीत शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीनं परिस्थिती सावरली आणि दोघांनी ८५ रन्सची भागेदारी केली. रोहीतनं ४० बॉल्समध्ये ५० रन्स ठोकले. पण, धोनी मात्र शेवटच्या ओव्हरला रन आऊट झाला. त्यानं ३३ बॉल्समध्ये ४५ रन्स केले होते. भारतानं १५४ रन्सचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभं केलं होतं.

आर. पी. सिंगनं द. आफ्रिकेच्या दोन्ही ओपनर्सला अचूक टीपलं. हर्षल गीब्स एलबीडब्ल्यू झाला तर ग्रॅहम स्मिथची कॅच दिनेश कार्तिकनं घेतली. द. आफ्रिकेची मधली फळी गारद झाली होती. इतरही काही कमाल दाखवू शकले नाहीत. मार्क बाऊचरनं ४१ बॉल्समध्ये ३६ रन्स तर अल्बे मॉरकेलनं ३७ बॉल्समध्य ३६ रन्स दिले.

आणि भारतानं ही मॅच ३७ रन्सच्या फरकानं घशात घातली आणि द. आफ्रिका टूर्नामेंटमधून बाद झाली. या विजयाबरोबर भारतानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

4/6

भारत विरुद्ध इंग्लंड (भारताचा १८ रन्सनं विजय)या मॅचनंही भारतीय क्रिकेट फॅन्सला एक थरारक अनुभव दिला होता. बऱ्याच जणांच्या ही मॅच आजही लक्षात आहे. पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या गंभीर आणि सेहवागनं शतकी खेळी करून भारतीय टीमसाठी भक्कम पाया उभारला. डॅरेन मॅडीनं गंभीरला १५ व्या ओव्हरला टिपलं पण तोपर्यंत भारतानं १३६ रन्सचा टप्पा गाठला होता. त्यानंतर ख्रिस ट्रिमलेटनं रॉबिन उथप्पा आणि सेहवागला आऊट केलं  आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट फॅन्सनं पाहिला तो केवळ चमत्कार होता. त्यानंतर खेळायला आलेल्या युवराज सिंगसमोर इंग्लंडचा खेळाडू अॅन्ड्र्यू फ्लिन्टॉफनं मैदानावरच काही अपशब्द उच्चारलेले सगळ्या पडद्यांवर स्पष्ट दिसलं. त्यानंतर रागाचा पारा चढलेला युवराजही सगळ्यांनी पाहिला आणि युवराजनं एका ओव्हरमध्ये ठोकलेले सहा सिक्सही... भारतीय फॅन्स, निवेदक आणि मैदानावर उपस्थित असलेल्यांसाठी हा क्षण काही उत्सवापेक्षा कमी नव्हता. किंग्समेड मैदानावर युवीनं एक इतिहास रचला होता. भारतानं २१८ रन्सची खेळी केली होती.    इंग्लंडनंही या खेळीला प्रत्युत्तर देण्याचा जोरदार प्रयत्न केला. ५.४ ओव्हरला इंग्लंडची पहिली विकेट उडाली यावेळी त्यांची धावसंख्या होती ५३. इरफान पठाननं दोन्ही ओपनर्सला टीपलं. केविन पीटरसननं २३ बॉल्समध्ये ३९ रन्स केले. पण हरभजननं त्याला बाद केलं. त्यानंतर इंग्लंडची चांगलीच पडझड झाली आणि शेवटी त्यांना १८ रन्सनं पराभवाला सामोरं जावं लागलं.

भारत विरुद्ध इंग्लंड (भारताचा १८ रन्सनं विजय)
या मॅचनंही भारतीय क्रिकेट फॅन्सला एक थरारक अनुभव दिला होता. बऱ्याच जणांच्या ही मॅच आजही लक्षात आहे. पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या गंभीर आणि सेहवागनं शतकी खेळी करून भारतीय टीमसाठी भक्कम पाया उभारला. डॅरेन मॅडीनं गंभीरला १५ व्या ओव्हरला टिपलं पण तोपर्यंत भारतानं १३६ रन्सचा टप्पा गाठला होता. त्यानंतर ख्रिस ट्रिमलेटनं रॉबिन उथप्पा आणि सेहवागला आऊट केलं आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट फॅन्सनं पाहिला तो केवळ चमत्कार होता.

त्यानंतर खेळायला आलेल्या युवराज सिंगसमोर इंग्लंडचा खेळाडू अॅन्ड्र्यू फ्लिन्टॉफनं मैदानावरच काही अपशब्द उच्चारलेले सगळ्या पडद्यांवर स्पष्ट दिसलं. त्यानंतर रागाचा पारा चढलेला युवराजही सगळ्यांनी पाहिला आणि युवराजनं एका ओव्हरमध्ये ठोकलेले सहा सिक्सही... भारतीय फॅन्स, निवेदक आणि मैदानावर उपस्थित असलेल्यांसाठी हा क्षण काही उत्सवापेक्षा कमी नव्हता. किंग्समेड मैदानावर युवीनं एक इतिहास रचला होता. भारतानं २१८ रन्सची खेळी केली होती.

इंग्लंडनंही या खेळीला प्रत्युत्तर देण्याचा जोरदार प्रयत्न केला. ५.४ ओव्हरला इंग्लंडची पहिली विकेट उडाली यावेळी त्यांची धावसंख्या होती ५३. इरफान पठाननं दोन्ही ओपनर्सला टीपलं. केविन पीटरसननं २३ बॉल्समध्ये ३९ रन्स केले. पण हरभजननं त्याला बाद केलं. त्यानंतर इंग्लंडची चांगलीच पडझड झाली आणि शेवटी त्यांना १८ रन्सनं पराभवाला सामोरं जावं लागलं.

5/6

भारत विरुद्ध न्यूझीलंड (किवींचा १० रन्सनं विजय)पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारत सातव्या आसमानावर पोहचला होता. पहिल्यांदा बॅटींग स्वीकारणाऱ्या किवींनी दुसऱ्याच ओव्हरमध्ये ओपनर लोऊ व्हिन्सेन्टला गमावलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची स्थिती ९१/ ५ अशी झाली. किवींची मिडल ऑर्डर ढासळली होती. त्यानंतर मात्र मॅकमिलनं ऑस्ट्रलियाची धुरा सांभाळली. त्यानं धुवाँदार खेळी करत २३ बॉल्समध्ये ४४ रन्स ठोकले. जेकॉब ओरामनंही त्याला उत्तम साथ दिली. त्यानंही ३ सिक्स ठोकत १५ बॉल्समध्ये ३५ रन्सची बरसात केली. किवींनी १९० रन्सची खेळी केली होती.किवींना प्रत्यूत्तर म्हणून आलेल्या गंभीर आणि सेहवागनं धडाकेबाज सुरूवात केली. त्यांनी केवळ ५.५ ओव्हर्समध्ये ७६ रन्स केले. पण, ओरम सेहवागला बाद करण्यात यशस्वी झाला आणि त्यानंतर मात्र भारताची पडझड सुरू झाली. सेहवागनंतर भारताचा एकही बॅटसमन यशस्वी पार्टनरशिप करू शकला नाही. आणि भारताला १० रन्सनं पराभव स्वीकारावा लागला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (किवींचा १० रन्सनं विजय)
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारत सातव्या आसमानावर पोहचला होता. पहिल्यांदा बॅटींग स्वीकारणाऱ्या किवींनी दुसऱ्याच ओव्हरमध्ये ओपनर लोऊ व्हिन्सेन्टला गमावलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची स्थिती ९१/ ५ अशी झाली. किवींची मिडल ऑर्डर ढासळली होती. त्यानंतर मात्र मॅकमिलनं ऑस्ट्रलियाची धुरा सांभाळली. त्यानं धुवाँदार खेळी करत २३ बॉल्समध्ये ४४ रन्स ठोकले. जेकॉब ओरामनंही त्याला उत्तम साथ दिली. त्यानंही ३ सिक्स ठोकत १५ बॉल्समध्ये ३५ रन्सची बरसात केली. किवींनी १९० रन्सची खेळी केली होती.

किवींना प्रत्यूत्तर म्हणून आलेल्या गंभीर आणि सेहवागनं धडाकेबाज सुरूवात केली. त्यांनी केवळ ५.५ ओव्हर्समध्ये ७६ रन्स केले. पण, ओरम सेहवागला बाद करण्यात यशस्वी झाला आणि त्यानंतर मात्र भारताची पडझड सुरू झाली. सेहवागनंतर भारताचा एकही बॅटसमन यशस्वी पार्टनरशिप करू शकला नाही. आणि भारताला १० रन्सनं पराभव स्वीकारावा लागला.

6/6

भारत विरुद्ध पाकिस्तान (बॉल आऊटनं मिळवला विजय)स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात विजय प्राप्त केल्यानंतर पाकिस्तानवरही मात करण्यासाठी भारतीय टीम उत्सुक होती. पहिल्यांदा बॅटींग स्वीकारणाऱ्या भारताची सुरुवातीलाच ३६ रन्सवर ४ आऊट अशी दयनीय स्थिती होती. पाकच्या मोहम्मद असीफनं भारताची वरची फळी खिळखिळी केली होती. पण रॉबिन उथप्पा मैदानावर आला आणि त्यानं ही स्थिती सावरली. ५० बॉल्समध्ये त्यानं ३९ रन्सचं योगदान दिलं. उथप्पाचा हा आक्रमकपणा भारतीय टीमची जमेची बाजू ठरला. शेवटी शेवटी महेंद्रसिंग धोनी आणि इरफान पठान यांच्या तडाखेबंद खेळीनं भारतानं पाकिस्तानसमोर १४२ रन्सचं आव्हान उभं केलं. यावेळी भारताची धावसंख्या १४१/५ अशी होती. पाकिस्ताननंही बॅटींगची करून विकेटसच्या बाबतीत भारताचीच री ओढली. पाकिस्ताननं ४७ रन्स करताना ४ गडी गमावले होते. पाक क्रिकेट फॅन्सलाही आता पाकिस्तान गटांगळ्या खाणार असं वाटत असतानाच मिसबाह उल हक यानं आपले बाजी पलटली. त्याच्या जोरदार खेळीमुळे पाकिस्तानी टीम विजयाच्या जवळ आली.शेवटचे दोन बॉल बाकी असताना पाकिस्तानला गरज होती ती फक्त एका रनची. पण, नेमका यावेळीच मिसबाह रन आऊट झाला आणि मॅच टाय झाली. विजेता ठरवण्यासाठी बॉल आऊटचा पर्याय स्वीकारला गेला. ही पहिलीच वेळ होती जिथं बॉल आऊटनं विजेता संघ ठरवला गेला होता. सेहवाग, हरभजन आणि उथप्पा यांनी स्टंपला उडवून लावलं तर अराफत, उमर गुल आणि आफ्रिदी मात्र यात सपशेल अपयशी ठरले आणि भारताच्या गोटात एकच जल्लोष झाला.

भारत विरुद्ध पाकिस्तान (बॉल आऊटनं मिळवला विजय)
स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात विजय प्राप्त केल्यानंतर पाकिस्तानवरही मात करण्यासाठी भारतीय टीम उत्सुक होती. पहिल्यांदा बॅटींग स्वीकारणाऱ्या भारताची सुरुवातीलाच ३६ रन्सवर ४ आऊट अशी दयनीय स्थिती होती. पाकच्या मोहम्मद असीफनं भारताची वरची फळी खिळखिळी केली होती. पण रॉबिन उथप्पा मैदानावर आला आणि त्यानं ही स्थिती सावरली. ५० बॉल्समध्ये त्यानं ३९ रन्सचं योगदान दिलं. उथप्पाचा हा आक्रमकपणा भारतीय टीमची जमेची बाजू ठरला. शेवटी शेवटी महेंद्रसिंग धोनी आणि इरफान पठान यांच्या तडाखेबंद खेळीनं भारतानं पाकिस्तानसमोर १४२ रन्सचं आव्हान उभं केलं. यावेळी भारताची धावसंख्या १४१/५ अशी होती.

पाकिस्ताननंही बॅटींगची करून विकेटसच्या बाबतीत भारताचीच री ओढली. पाकिस्ताननं ४७ रन्स करताना ४ गडी गमावले होते. पाक क्रिकेट फॅन्सलाही आता पाकिस्तान गटांगळ्या खाणार असं वाटत असतानाच मिसबाह उल हक यानं आपले बाजी पलटली. त्याच्या जोरदार खेळीमुळे पाकिस्तानी टीम विजयाच्या जवळ आली.

शेवटचे दोन बॉल बाकी असताना पाकिस्तानला गरज होती ती फक्त एका रनची. पण, नेमका यावेळीच मिसबाह रन आऊट झाला आणि मॅच टाय झाली. विजेता ठरवण्यासाठी बॉल आऊटचा पर्याय स्वीकारला गेला. ही पहिलीच वेळ होती जिथं बॉल आऊटनं विजेता संघ ठरवला गेला होता. सेहवाग, हरभजन आणि उथप्पा यांनी स्टंपला उडवून लावलं तर अराफत, उमर गुल आणि आफ्रिदी मात्र यात सपशेल अपयशी ठरले आणि भारताच्या गोटात एकच जल्लोष झाला.