1/11
पुन्हा मोठ्या पडद्यावर
लग्नानंतर करीष्माने करीनासाठी सिनेमाची वाट खुली करून दिली. मात्र ता करीनाही सुपरस्टार बनल्यावर करीष्मा पुन्हा मोठ्या पडद्यावर परतली आहे. रजनीश दुग्गल या अभिनेत्यासोबत तिने विक्रम भट्टच्या ‘डेंजरस इश्क’ या सिनेमात अभिनय केला. मात्र या सिनेमात तिने प्रमुख भूमिकाच साकारली. इतकी वर्षं लोटली तरी तिचं संदर्य कमी झालेलं नाही. त्यामुळेच ती प्रमुख भूमिका करू शकते.
2/11
3/11
4/11
5/11
विवाह
बच्चन कुटुंबाशी काडीमोड घेतल्यावर करीष्माला लवकरात लवकर विवाह करणं भाग होतं. करीष्माच्या आईने तिचा विवाह तिचा बालमित्र आणि दिल्ली स्थित बिझनेसमन संजय कपूर यांच्या घडवून आणला. लवकरच त्यांच्यात पटत नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. घटस्फोटापर्यंत हे प्रकरण आलं होतं. मात्र त्याचवेळी करीष्माला मुलगी झाल्यामुळे लग्नाला पुन्हा एक संधी देण्याचं दोघांनी ठरवलं.
6/11
ब्रेक अप
अभिनयाचा बादशाह मानल्या गेलेल्या अमिताभ बच्चन यांच्या मुलाशी म्हणजेच अभिषेक बच्चनशी तोपर्यंत करीष्माचं सुत जुळलं होतं. दोन्ही घराण्यांनाही हा विवाह मान्य होता. त्यामुळे करीष्मा अभिषेकचा थाटामाटात साखरपुडा झाला. मात्र काही कारणांवरून हे लग्न होऊ शकलं नाही. करीष्मा- अभिषेकचं लग्न होण्यापूर्वी मोडलं. हा सगळ्यांसाठीच फार मोठा धक्का होता.
7/11
शापित राजकन्या
गोविंदा, अक्षय कुमार, सलमान खान यांच्यासोबत काम करत असल्यामुळे सिनेमे हिट होत होते. गोविंदा-करीष्माची जोडीतर प्रचंड लोकप्रिय होती. पण तरी करीष्माची स्वतःची ओळख निर्माण होत नव्हती. ‘झुबेदा’ या सिनेमातील तिचा अभिनय मात्र तिच्या अभिनय संपन्नतेची आणि सौंदर्याची उत्तुंग मजल गाठणारा ठरला. त्यात एखाद्या राजकन्येच्या दिमाखात वावरलेली करीष्मा म्हणजे परीकथेतली राणीच वाटली.
8/11
राजा हिंदुस्तानी
करीष्माच्या अभिनयाचा महत्वपूर्ण ठसा उमटवणारा सिनेमा म्हणजे राजा हिंदुस्तानी.. तोपर्यंत करीष्मा सिनेमात असली, तरी तिची फारशी दखल कुणी घेत नव्हतं. पण ‘राजा हिंदुस्तानी’मध्ये ती आपल्या अभिनयामुळे काही प्रसंगात आमिर खानलाही भारी पडली. मनिष मल्होत्राने केलेल्या मेकओव्हरमुळे लोलोचं सौंदर्य दुप्पट वाढलं. त्यातही तिचं आमिरबरोबरचं पावसातील चुंबनदृश्य खूप गाजलं.
9/11
10/11
11/11