क्रेझ निर्माण करणाऱ्य़ा फॅशन्स

Aug 25, 2012, 22:17 PM IST
1/8

दिल्ली ६जुन्या दिल्लीतल्या चांदनी चौकमधील साधी सलवार कुर्ता घालणाऱ्या मुलीची खरंतर कसली आलीये फॅशन? पण ७० एमएमच्या पडद्यावर स्टायलिश सोनम कपूरला या पोशाखात पाहून अनारकली सुट्सची फॅशन आली. फुल स्लीव्ह्जचे कुर्ते, प्रिंटेड फॅब्रिकचं डिझाइन अशी देशी फॅशन ताबडतोब महिलांकडून उचलली गेली.

दिल्ली ६
जुन्या दिल्लीतल्या चांदनी चौकमधील साधी सलवार कुर्ता घालणाऱ्या मुलीची खरंतर कसली आलीये फॅशन? पण ७० एमएमच्या पडद्यावर स्टायलिश सोनम कपूरला या पोशाखात पाहून अनारकली सुट्सची फॅशन आली. फुल स्लीव्ह्जचे कुर्ते, प्रिंटेड फॅब्रिकचं डिझाइन अशी देशी फॅशन ताबडतोब महिलांकडून उचलली गेली.

2/8

जब वी मेटभटिंडाला निघालेली बबली, बडबडी, निरागस गीत आठवतेय? अर्ध्या रात्री सामान गाडीतच राहिल्याने पटियाला सलवार, टी-शर्ट, बांगड्या आणि स्लीपर घालून गीतला वावरावं लागतं. पण करीनाच्या या अनोख्या पेहेरावाने तमाम कॉलेज कुमारींना नवा फॅशन मंत्र दिला. ही जगावेगळी फॅशन तरुण वर्गाला बेहद्द पसंत पडली आणि करीनाचं हे नवं स्टाइल स्टेटमेंट तिच्या यशाचं एक महत्वपूर्ण अंग बनलं.

जब वी मेट
भटिंडाला निघालेली बबली, बडबडी, निरागस गीत आठवतेय? अर्ध्या रात्री सामान गाडीतच राहिल्याने पटियाला सलवार, टी-शर्ट, बांगड्या आणि स्लीपर घालून गीतला वावरावं लागतं. पण करीनाच्या या अनोख्या पेहेरावाने तमाम कॉलेज कुमारींना नवा फॅशन मंत्र दिला. ही जगावेगळी फॅशन तरुण वर्गाला बेहद्द पसंत पडली आणि करीनाचं हे नवं स्टाइल स्टेटमेंट तिच्या यशाचं एक महत्वपूर्ण अंग बनलं.

3/8

दिल तो पागल हैमाधुरी दीक्षितने पुन्हा आपल्या सोज्वल आणि सेक्सी स्टाइलने लोकांना वेड लावलं. यामध्ये तिच्या फॅशनेबल ड्रेसेसचाही महत्वाचा वाटा होता. स्वप्नाळू, रोमँटिक कॅरेक्टर रंगवणाऱ्या माधुरीने शिफॉनचा टाईट पंजाबी ड्रेस फॅशनमध्ये आणला. तर करिश्मा कपूरने अल्ट्रा मॉडर्न वेस्टर्न आऊटफिट्सचा जमना आणला.

दिल तो पागल है
माधुरी दीक्षितने पुन्हा आपल्या सोज्वल आणि सेक्सी स्टाइलने लोकांना वेड लावलं. यामध्ये तिच्या फॅशनेबल ड्रेसेसचाही महत्वाचा वाटा होता. स्वप्नाळू, रोमँटिक कॅरेक्टर रंगवणाऱ्या माधुरीने शिफॉनचा टाईट पंजाबी ड्रेस फॅशनमध्ये आणला. तर करिश्मा कपूरने अल्ट्रा मॉडर्न वेस्टर्न आऊटफिट्सचा जमना आणला.

4/8

राजा हिंदुस्तानीया सिनेमातील फॅशनने करिश्मा कपूरचं युग सुरू केलं. राजा हिंदुस्तानीमधील फॅशनमुळे स्कर्ट आणि ड्रेसेस चिप न वाटता स्टाइलिश वाटू लागले. करिश्माचं सबंध करिअर नव्याने उजळून निघालं. लोलोचा फेव्हरेट कॉश्चुम डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या कल्पनेतून ही फॅशन आली होती. सिनेमात करिश्मा दिसलीही एकदम मस्त.. त्यामुळे उच्चभ्रु वर्गात ती फॅशन आली नसती, तरच नवल!

राजा हिंदुस्तानी
या सिनेमातील फॅशनने करिश्मा कपूरचं युग सुरू केलं. राजा हिंदुस्तानीमधील फॅशनमुळे स्कर्ट आणि ड्रेसेस चिप न वाटता स्टाइलिश वाटू लागले. करिश्माचं सबंध करिअर नव्याने उजळून निघालं. लोलोचा फेव्हरेट कॉश्चुम डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या कल्पनेतून ही फॅशन आली होती. सिनेमात करिश्मा दिसलीही एकदम मस्त.. त्यामुळे उच्चभ्रु वर्गात ती फॅशन आली नसती, तरच नवल!

5/8

देवदाससंजय लीला भन्साळींच्या देवदासमध्ये सगळंच श्रीमंती आणि त्भव्य दिव्य वाटत होतं. त्यातील दोन दोन अप्सरांची अदाकारी तर लाजवाब होतीच. पण, त्याच बरोबर त्यांना दिलेला पोशाखही नैत्रदीपक होता. बंगाली पारंपरिक साडी, लेहेंगा यांनी नवा ट्रेंड आणला. अबू जानी- संदीप खोसला आणि नीता लुल्ला यांच्या कल्पनेतून साकार झालेली ही फॅशन तरुणींची लाडकी झाली.

देवदास
संजय लीला भन्साळींच्या देवदासमध्ये सगळंच श्रीमंती आणि त्भव्य दिव्य वाटत होतं. त्यातील दोन दोन अप्सरांची अदाकारी तर लाजवाब होतीच. पण, त्याच बरोबर त्यांना दिलेला पोशाखही नैत्रदीपक होता. बंगाली पारंपरिक साडी, लेहेंगा यांनी नवा ट्रेंड आणला. अबू जानी- संदीप खोसला आणि नीता लुल्ला यांच्या कल्पनेतून साकार झालेली ही फॅशन तरुणींची लाडकी झाली.

6/8

हम आपके है कौन?डिझायनर नीता लुल्लाने हम आपके है कौन? सिनेमात माधुरी दीक्षितला ज्या पद्धतीने सजवलं, ते पाहून तमाम देशात लग्नसराईत माधुरीसारख्याच ट्रॅडिशनल बॅकलेस साड्यांची आणि हिरव्या शरारांची मागणी वाढली. शरारांचा खप प्रचंड वाढला. लग्नामध्ये माधुरीप्रमाणेच जांभळा बॅकलेस ब्लाऊज घालून मिरवण्यात तरुण मुली धन्यता मानू लागल्या.

हम आपके है कौन?
डिझायनर नीता लुल्लाने हम आपके है कौन? सिनेमात माधुरी दीक्षितला ज्या पद्धतीने सजवलं, ते पाहून तमाम देशात लग्नसराईत माधुरीसारख्याच ट्रॅडिशनल बॅकलेस साड्यांची आणि हिरव्या शरारांची मागणी वाढली. शरारांचा खप प्रचंड वाढला. लग्नामध्ये माधुरीप्रमाणेच जांभळा बॅकलेस ब्लाऊज घालून मिरवण्यात तरुण मुली धन्यता मानू लागल्या.

7/8

मि. इंडिया९०च्या दशकात जन्माला आलेल्या लोकांना मि. इंडियामधील श्रीदेवीने आणलेली फॅशन नक्की लक्षात असणार. निळी शिफॉन साडी ही खरंतर अत्यंत साधी स्टाइल... पण श्रदेवीने आपल्या खास अंदाजात ही साडी नेसून जो काही डान्स सादर केला, की सबंध देश घायाळ झाला. आणि शिफॉन साडी ही अचानक सेक्सी आणि फॅशनेबल वाटू लागली.

मि. इंडिया
९०च्या दशकात जन्माला आलेल्या लोकांना मि. इंडियामधील श्रीदेवीने आणलेली फॅशन नक्की लक्षात असणार. निळी शिफॉन साडी ही खरंतर अत्यंत साधी स्टाइल... पण श्रदेवीने आपल्या खास अंदाजात ही साडी नेसून जो काही डान्स सादर केला, की सबंध देश घायाळ झाला. आणि शिफॉन साडी ही अचानक सेक्सी आणि फॅशनेबल वाटू लागली.

8/8

तरुणींना भुरळ पाडणारी बॉलिवूड फॅशनवर्षांनुवर्षं बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या फॅशनची कॉपी केली जाते. त्यांनी घातलेले ड्रेसेस देशभरातल्या मुलींना, महिलांना वेडं करतात. या अभिनेत्रींसारखा लूक मिळवण्यासाठी अशी फॅशन केली जाते. आपल्या आवडत्या अभिनेत्री सारखं दिसावं यासाठी तमाम तरुणी वर्ग प्रयत्नशील होतो. यामुळेच अभिनेत्रीदेखील प्रत्येक सिनेमागणिक नवी फॅशन आणत असतात.

तरुणींना भुरळ पाडणारी बॉलिवूड फॅशन
वर्षांनुवर्षं बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या फॅशनची कॉपी केली जाते. त्यांनी घातलेले ड्रेसेस देशभरातल्या मुलींना, महिलांना वेडं करतात. या अभिनेत्रींसारखा लूक मिळवण्यासाठी अशी फॅशन केली जाते. आपल्या आवडत्या अभिनेत्री सारखं दिसावं यासाठी तमाम तरुणी वर्ग प्रयत्नशील होतो. यामुळेच अभिनेत्रीदेखील प्रत्येक सिनेमागणिक नवी फॅशन आणत असतात.