1/5
काँग्रेसच्या बैठकीत अशोक चव्हाण – राणे गैरहजर
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची वर्षावर बैठक झाली. या बैठकीत ६० आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलाय पण या बैठकीला अशोक चव्हाण आणि नारायण राणे हे दोघे नेते मात्र अनुपस्थित होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणच कायम राहणार असल्याचे संकेत दिल्लीकडूनही मिळालेत.
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर वर्षावर काँग्रेस आमदारांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या ६० आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय. त्याचबरोबर राष्ट्रवादीची राजकीय नाकाबंदी करणारे निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवू नये, अशी मागणी आता काँग्रेस आमदार करु लागलेत.
2/5
शरद पवार मुंबईत, जोर-बैठका सुरू
राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले, असून दिवसभर जोर-बैठकाचा सिलसिला सुरू होता. सुमारे दोन तास शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली, त्यानंतर यशवंतराव सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली, आता सध्या विधीमंडळात सर्व आमदारांसह शरद पवार बैठक घेत असून त्यांनंतर या राजीनाम्या नाट्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार आज मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अजित पवार, प्रफुल पटेल, मधुकर पिचड यांच्यासह सुमारे १ तास ५० मिनिटे बैठक घेतली. तसेच ज्येष्ठ नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. या दोन्ही बैठकीनंतर आता विधीमंडळात शरद पवारांच्या उपस्थितीत अजून एक बैठक सुरू असून त्यात शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
3/5
शरद पवार दैवत, त्यांचा निर्णय मान्य होईल- अजित दादा
शरद पवार हे माझे दैवत असून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे आज अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राजीनाम्याबद्दल त्यांनी कोणतंही वक्तव्य न केल्याने अजूनही सस्पेन्स कायम आहे.
पाटबंधारे खात्यासंदर्भात माझ्या विरोधात जे आरोप झाले ते एका षड्यंत्राचा भाग आहे, हे षड्यंत्र करणारी व्यक्ती कोण आहे हे मला माहित असल्याचे अजित पवार यांनी सांगितले, परंतु कोणत्याही व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलं नाही. पवार साहेब माझे दैवत आहे. ते जो काही निर्णय घेतील, तो माझ्यासाठी अंतीम असेल, तसेच माझा प्रत्येक प्रयत्न हा पक्ष वाढीसाठी असेल, असेही अजित पवार यांनी आज विधीमंडळात राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर बोलताना सांगितले.
4/5
अखेर काकांनी मंजूर केला पुतण्याचा राजीनामा
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या विधिमंडळांने अजित पवार यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्य़क्षतेखाली झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला आहे.
विधिमंडळात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. तर दुसरीकडं सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या बैठकीत होणा-या निर्णयाच्या प्रतिक्षेत होते. अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत शिक्कामोर्तब झालेला आहे.
5/5