ICC टी-२० वर्ल्डकप - नजर गोलंदाजांवर

Sep 21, 2012, 18:24 PM IST
1/8

डॅनियल व्हिट्टोरी३३ वर्षीय दिग्गज किवी स्पिनर डॅनियल व्हिट्टोरी यांने वनडेतून निवृत्ती घेतल्यावर फक्त टेस्ट क्रिकेटवरच लक्ष देणार असल्येच स्पष्ट केले होते. मात्र टी-२० च्या फॉरमॅटमध्ये खेळण्यांपासून तो स्वत:ला रोखू शकला नाही. आणि आतच्या टी-२० वर्ल्डकपच्या चमूत त्याच्या समावेशही करण्यात आला आहे. २८ टी२० मॅचमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ५.३६ इतका राहिला आहे. मात्र न्यूझीलंडचा कॅप्टनचा त्याच्यावर तितकाच विश्वासही आहे.

डॅनियल व्हिट्टोरी
३३ वर्षीय दिग्गज किवी स्पिनर डॅनियल व्हिट्टोरी यांने वनडेतून निवृत्ती घेतल्यावर फक्त टेस्ट क्रिकेटवरच लक्ष देणार असल्येच स्पष्ट केले होते. मात्र टी-२० च्या फॉरमॅटमध्ये खेळण्यांपासून तो स्वत:ला रोखू शकला नाही. आणि आतच्या टी-२० वर्ल्डकपच्या चमूत त्याच्या समावेशही करण्यात आला आहे.

२८ टी२० मॅचमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ५.३६ इतका राहिला आहे. मात्र न्यूझीलंडचा कॅप्टनचा त्याच्यावर तितकाच विश्वासही आहे.

2/8

डेल स्टेनडेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्कल ही यावेळेसची सगळ्यात घातक अशी जोडी आहे. मॉर्ने मॉर्केल सगळ्यात यशस्वी असा आयपीएल मधला बॉलर ठरला आहे. आणि डेल स्टेनचा मारा किती घातक आहे हे त्यांची बॉलिंग पाहिल्यावरच दिसून येतं. स्टेनने आजवर २२ टी-२० मॅचमध्ये ३० विकेट घेतल्या आहेत. त्याने वयाची २९शी उलटली तरी तो तरूणांना प्रमाणेच आपला खेळ खेळतो आहे. आणि त्यांच्याबरोबरीनेच पैसाही कमावतो आहे.

डेल स्टेन
डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्कल ही यावेळेसची सगळ्यात घातक अशी जोडी आहे. मॉर्ने मॉर्केल सगळ्यात यशस्वी असा आयपीएल मधला बॉलर ठरला आहे. आणि डेल स्टेनचा मारा किती घातक आहे हे त्यांची बॉलिंग पाहिल्यावरच दिसून येतं.

स्टेनने आजवर २२ टी-२० मॅचमध्ये ३० विकेट घेतल्या आहेत. त्याने वयाची २९शी उलटली तरी तो तरूणांना प्रमाणेच आपला खेळ खेळतो आहे. आणि त्यांच्याबरोबरीनेच पैसाही कमावतो आहे.

3/8

लसिथ मलिंगाइंडियाच्या विरूद्ध श्रीलंका टीम नेहमीच अडखळताना दिसते. मात्र त्यांच्याकडे मलिंगा हा बॉलर असा बॉलर आहे जो, त्याच्या एका ओव्हरमध्येच समोरच्या टीमचा खेळ खल्लास करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मलिंगाच्या यॉर्करची बॅट्समनना देखील भीती वाटते. कारण की, एकतर त्याच्या यॉर्कर बॉलने अंगठा तुटण्याची शक्यता असते किंवा क्लीन बोल्ड होतो. आणि म्हणूनच त्याची भीती अनेक बॅट्समनना वाटत असते. प्रेक्षकांना नेहमीच मलिंगाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. आणि त्यामुळे तेदेखील उत्साही असतात.

लसिथ मलिंगा
इंडियाच्या विरूद्ध श्रीलंका टीम नेहमीच अडखळताना दिसते. मात्र त्यांच्याकडे मलिंगा हा बॉलर असा बॉलर आहे जो, त्याच्या एका ओव्हरमध्येच समोरच्या टीमचा खेळ खल्लास करू शकतो.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मलिंगाच्या यॉर्करची बॅट्समनना देखील भीती वाटते. कारण की, एकतर त्याच्या यॉर्कर बॉलने अंगठा तुटण्याची शक्यता असते किंवा क्लीन बोल्ड होतो. आणि म्हणूनच त्याची भीती अनेक बॅट्समनना वाटत असते. प्रेक्षकांना नेहमीच मलिंगाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. आणि त्यामुळे तेदेखील उत्साही असतात.

4/8

ब्रॅड हॉजया बॉलरच्या वयावर अजिबात जाऊ नका. वयाच्या ४१व्या वर्षीही ब्रॅड हॉजची बॉलिंग मात्र भन्नाट आहे. त्याने टाकलेला बॉल ओळखण्याताना मोठमोठ्या बॅट्समनचीही दांडी गूल होते. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने अगदी अनपेक्षितपणे टी-२० वर्ल्डकप टीमच्या चमूत ब्रॅड हॉजचा समावेश केला. या दिग्गज खेळाडूचा समावेश केल्याने ऑस्ट्रेलिया टीमचा हुरूप नक्कीच वाढला असेल. श्रीलंकेतील खेळपट्ट्यांवर ब्रॅडला वापरणं हे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रॅड हॉज
या बॉलरच्या वयावर अजिबात जाऊ नका. वयाच्या ४१व्या वर्षीही ब्रॅड हॉजची बॉलिंग मात्र भन्नाट आहे. त्याने टाकलेला बॉल ओळखण्याताना मोठमोठ्या बॅट्समनचीही दांडी गूल होते.

ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने अगदी अनपेक्षितपणे टी-२० वर्ल्डकप टीमच्या चमूत ब्रॅड हॉजचा समावेश केला. या दिग्गज खेळाडूचा समावेश केल्याने ऑस्ट्रेलिया टीमचा हुरूप नक्कीच वाढला असेल. श्रीलंकेतील खेळपट्ट्यांवर ब्रॅडला वापरणं हे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं ठरणार आहे.

5/8

रवीचंद्रन अश्विनदोनदा आयपीएलचं विजेतापद पटकावणारी चेन्नई सुपर किंग ही खऱ्या अर्थाने बऱ्याचवेळेस आर. आश्विनच्या मिळवून दिलेल्या ब्रेक-थ्रूमुळेच. आणि त्यामुळेच धोनीला मोठे विजय साकारता आले आहेत. तो टाकत असलेल्या कॅरम बॉल हा तर अनेकदा त्याला विकेट मिळवून देत असतो. सध्याच्या अनेक स्पिर्नसपैकी आर. आश्विन हा एक उत्तम असा स्पिनर बॉलर आहे. मात्र टी-२० मॅचमध्ये त्याचा म्हणावा तसा परफॉर्मन्स नाहीये. दहा टी-२० मॅचमध्ये फक्त सात विकेट घेऊ शकला आहे. मात्र श्रीलंकेत फिरकीला अनुकूल अशी खेळपट्टी असल्याने आश्विन विरूद्ध रन करणं बॅट्समनना जड जाऊ शकतं.

रवीचंद्रन अश्विन
दोनदा आयपीएलचं विजेतापद पटकावणारी चेन्नई सुपर किंग ही खऱ्या अर्थाने बऱ्याचवेळेस आर. आश्विनच्या मिळवून दिलेल्या ब्रेक-थ्रूमुळेच. आणि त्यामुळेच धोनीला मोठे विजय साकारता आले आहेत. तो टाकत असलेल्या कॅरम बॉल हा तर अनेकदा त्याला विकेट मिळवून देत असतो. सध्याच्या अनेक स्पिर्नसपैकी आर. आश्विन हा एक उत्तम असा स्पिनर बॉलर आहे.

मात्र टी-२० मॅचमध्ये त्याचा म्हणावा तसा परफॉर्मन्स नाहीये. दहा टी-२० मॅचमध्ये फक्त सात विकेट घेऊ शकला आहे. मात्र श्रीलंकेत फिरकीला अनुकूल अशी खेळपट्टी असल्याने आश्विन विरूद्ध रन करणं बॅट्समनना जड जाऊ शकतं.

6/8

सुनील नारायनरहस्यमय बॉलर अशी ज्याची ख्याती झाली आहे असा आणि ज्याने आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवणारा वेस्ट इंडिजचा सुनील नारायन. आपल्या वेगवेगळ्या व्हेरीएशन मुळे अनेक बॅट्समनची भंबेरी उडवणारा असा घातक बॉलर ठरला आहे. टी-२० वर्ल्डकप मध्ये टॉप फाईव्ह विकेट घेणारा बॉलर ठरू शकतो. त्याच्याकडून तशी अपेक्षा देखील केली जात आहे. सुनीलने देखील ते सिद्ध करून दाखवलं आहे. ५ टी-२० मॅचमध्ये त्याने त्याच्यातील असणारी प्रचंड क्षमता दाखवून दिलेली आहे. त्यामुळे एक घातक बॉलर म्हणून सुनील नारायन ठरू शकतो.

सुनील नारायन
रहस्यमय बॉलर अशी ज्याची ख्याती झाली आहे असा आणि ज्याने आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवणारा वेस्ट इंडिजचा सुनील नारायन. आपल्या वेगवेगळ्या व्हेरीएशन मुळे अनेक बॅट्समनची भंबेरी उडवणारा असा घातक बॉलर ठरला आहे. टी-२० वर्ल्डकप मध्ये टॉप फाईव्ह विकेट घेणारा बॉलर ठरू शकतो. त्याच्याकडून तशी अपेक्षा देखील केली जात आहे.

सुनीलने देखील ते सिद्ध करून दाखवलं आहे. ५ टी-२० मॅचमध्ये त्याने त्याच्यातील असणारी प्रचंड क्षमता दाखवून दिलेली आहे. त्यामुळे एक घातक बॉलर म्हणून सुनील नारायन ठरू शकतो.

7/8

ग्रॅहम स्वानग्रॅहम स्वान हा टी-२० मधील सध्या नंबर एकवर असणारा बॉलर आहे. ग्रॅहम स्वान हा ऑफस्पिनर असून त्याने ३२ इंटरनॅशनल टी-२० मॅचमध्ये ४१ विकेट घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने त्यांच्या बॅटींगनेही इंग्लंडला वेळोवेळी मदत केली आहे. त्याच्यासारख्या ऑलराऊंडर खेळाडूमुळे इंग्लंड संघाला मात्र चांगलाच फायदा झाला आहे. इंग्लंडच्या टीममधील तो एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. ३३ वर्षाच्या या बचावात्मक खेळाडूकडून इंग्लंडला फार आशा आहेत.

ग्रॅहम स्वान
ग्रॅहम स्वान हा टी-२० मधील सध्या नंबर एकवर असणारा बॉलर आहे. ग्रॅहम स्वान हा ऑफस्पिनर असून त्याने ३२ इंटरनॅशनल टी-२० मॅचमध्ये ४१ विकेट घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने त्यांच्या बॅटींगनेही इंग्लंडला वेळोवेळी मदत केली आहे. त्याच्यासारख्या ऑलराऊंडर खेळाडूमुळे इंग्लंड संघाला मात्र चांगलाच फायदा झाला आहे.

इंग्लंडच्या टीममधील तो एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. ३३ वर्षाच्या या बचावात्मक खेळाडूकडून इंग्लंडला फार आशा आहेत.

8/8

सईद अजमलऑस्ट्रेलियावर दबाव टाकणं आणि त्यांना पराभूत करणं हे काही सोपं नाहीये. मात्र सईद अजमल हा पाकिस्तानचा नवा स्पिनर मात्र ऑसींना चांगलच गोत्यात आणू शकतो. नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये ऑसी बॅट्समन हे अजमलच्या फिरकीसमोर अजिबात टिकाऊ धरू शकले नव्हते. त्यामुळे पाकिस्तानला जिंकून देण्यामध्ये अजमल महत्त्वाची भुमिका बजावू शकतो. टी-२० टॉप बॉलरमध्ये येण्यासाठी त्याला फक्त ५ पॉईंटची आवश्यकता आहे. इंग्लंडचा स्वान हा सध्या नंबर एकवर आहे.

सईद अजमल
ऑस्ट्रेलियावर दबाव टाकणं आणि त्यांना पराभूत करणं हे काही सोपं नाहीये. मात्र सईद अजमल हा पाकिस्तानचा नवा स्पिनर मात्र ऑसींना चांगलच गोत्यात आणू शकतो.

नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये ऑसी बॅट्समन हे अजमलच्या फिरकीसमोर अजिबात टिकाऊ धरू शकले नव्हते. त्यामुळे पाकिस्तानला जिंकून देण्यामध्ये अजमल महत्त्वाची भुमिका बजावू शकतो. टी-२० टॉप बॉलरमध्ये येण्यासाठी त्याला फक्त ५ पॉईंटची आवश्यकता आहे. इंग्लंडचा स्वान हा सध्या नंबर एकवर आहे.