देवउठनी एकादशी आणि तुळशी विवाह दिनी 3 दुर्लभ संयोग! 'या' लोकांवर होणार धनवर्षाव

Tulsi Vivah 2025 : कार्तिक एकादशी आणि तुळशी विवाहच्या दिवशी तीन दुर्मिळ योग जुळून आले आहेत. सर्वाथ सिद्धी योग, रवी योग आणि शतभिषा नक्षत्र असणार आहेत. असा हा शुभ योग काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.

नेहा चौधरी | Updated: Nov 1, 2025, 09:08 PM IST
देवउठनी एकादशी आणि तुळशी विवाह दिनी 3 दुर्लभ संयोग! 'या' लोकांवर होणार धनवर्षाव

Tulsi Vivah 2025 : हिंदू पंचांगानुसार तुळशी विवाह आणि देवउठनी किंवा कार्तिक एकादशी 2 नोव्हेंबर 2025 रविवारी असणार आहे. यादिवशी सर्वाथ सिद्धी योग, रवी योग आणि शतभिषा नक्षत्र असणार आहे. त्यासोबत शुक्र ग्रहण तूळ राशीत भ्रमण करणार आहे. संपत्तीचा कारक शुक्रची तूळ राशीतील स्थितीतून मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग पंच महापुरुष योगांपैकी एक अत्यंत शुभ योग आहे. असा हा योग काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. यात तुमची रास आहे का? जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

वृषभ रास 

या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत, आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघड होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. वैवाहिक जीवन देखील सुसंवादी राहणार आहे. 

कन्या रास 

तुळशी विवाह आणि कार्तिक एकादशी या राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. यादिवशी तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येणार आहेत. या लोकांच्या नात्यात तणाव असेल पण तो हळूहळू कमी होणार आहे. नात्यात गोडवा निर्माण होणार आहे. या दिवसात तुम्ही शुभ निर्णय घेणार आहात. तुमच्या आयुष्यात सुख शांती असणार आहे.

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठी तुळशीविवाह फार लाभदाय सिद्ध असणार आहे. तुमचे जुने गैरसमज दूर होणार आहे. तसंच, या काळात तुम्ही एखाद्या नवीन वस्तूची देखील खरेदी करणार आहात. घरात सकारात्मक वातावरण असणार आहे. तसंच, तुमच्या वाणीत गोडवा निर्माण होणार आहे. या काळात तुमचं घर आणि करिअर दोघांमध्ये स्थिरता राहणार आहे. 

मकर रास

या लोकांसाठी, विवाहाशी संबंधित अडथळे दूर होणार आहेत. वैवाहिक सुख आणि शांती तुमच्या आयुष्यात असणार आहे. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होणार आहे. पण, खर्चावर संयम ठेवा. 

मीन रास

तुळशी विवाह या राशीसाठी भाग्यशाली सिद्ध होणार आहे. या काळात अनेक प्रवासाचे योग तुमच्या आयुष्यात येणार आहे. नवीन अनुभवांतून तुम्हाला खूप काही शिकता येणार आहे. तुमचं प्रेम जीवन चांगलं राहणार आहे. तसंच, ग्रहांच्या शुभ संक्रमणामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येणार आहे. 

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More