मुंबई : दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाचे संकेत. जाणून घ्या आजचे भविष्य...
मेष- व्यापारामध्ये आज सावधगिरी बाळगा. दुहेरी उत्साहानं एखाद्या कामाची सुरुवात करा. नफा नक्कीच मिळेल. यश तुमच्या प्रतिक्षेत आहे.
वृषभ-आज नोकरीच्या ठिकाणी कोणाशीच वाद घालू नका. आजुबाजूला लक्ष ठेवा. तुमच्या प्रत्येक वक्तव्याला आज प्रमाण मानलं जाणार आहे.
मिथुन- आज एखाद्या महागड्या वस्तूची खरेदी कराल. विषय कोणताही असो. शांत राहा, सर्व मार्ग मिळतील. आज नशीब तुम्हाला साथ देणार आहे.
कर्क- आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळणार आहे. नशीबच तुम्हाला यशाचा मार्ग दाखणार आहे. कोणाचंही बोलणं मनाला लावून घेऊ नका.
सिंह- मनकवडेपणा बाजूला ठेवत इतरांच्या कलानंही घ्यायला शिका. मनात कोणकाही संकोच ठेऊ नका. भविष्याची चिंता करत वर्तमान बिघडवू नका.
तुळ- मिळालेल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यामुळं आज तुमचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला असेल. खर्चांवर ताबा ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी धोका ओळखा. कोणाचंही मन दुखावू नका. आरोग्याची काळजी घ्या. दिवस आनंददायी आहे.
धनु- आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. अनपेक्षितपणे एखादी अशी व्यक्ती भेटेल जी आयुष्य बदलून टाकणार आहे. हीच व्यक्ती तुमच्या भाग्योदयाचं कारणंही ठरणार आहे.
मकर- आज काही नव्या प्रकल्पांचं काम तुमच्या हाती येणार आहे. घाईघाईत मात्र कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ- नोकरीच्या क्षेत्रात बदल घडण्याची मोठी संधी आहे. मनाजोगं यश मिळेल. उगाचच मानसिक तणाव घेणं बंद करा.
मीन- आज वरिष्ठांच्य़ा मदतीनं यशाची वाट चालू शकाल. कुठेही कोणावरही अती विश्वास ठेवू नका. कुटुंबाला वेळ द्या. आजचा दिवस तुमचाच आहे.