केरसुणी वापरताना ही चूक करताय? सावधान होईल मोठं नुकसान

लक्ष्मीचं दुसरं रुप केरसुणी, घरात ठेवल्याने होतील हे फायदे, काळजी न घेतल्यास होईल नुकसान

Updated: May 15, 2022, 04:14 PM IST
केरसुणी वापरताना ही चूक करताय? सावधान होईल मोठं नुकसान title=

मुंबई : आपल्या घरात झाडू नेहमी खुंटीला टांगलेली किंवा एका कोपऱ्यात असते. झाडूला लक्ष्मी म्हटलं जातं. घरातली साफसफाई करण्यासाठी झाडूचा वापर होतो. घर स्वच्छ असेल तर लक्ष्मी आनंदाने घरात नांदते असं म्हणतात. पण झाडूबाबतच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? 

झाडूला जसं लक्ष्मी मानलं जातं. जर या झाडूबाबतच्या काही गोष्टी समजून घेतल्या नाहीत तर घरातील लक्ष्मी रागवते असं म्हटलं जातं. प्रत्येकाला झाडूबाबतच्या या गोष्टी माहीत असायला हव्यात. 

घरातील घाण बाहेर गेली की आपोआपच स्वच्छता, पावित्र्य आणि संपत्ती येते. तेव्हा गरिबी दूर होते, तेव्हाच लक्ष्मी माता घरात वास करते असं म्हटलं जातं. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले गेले आहे.

-जर तुम्ही नवीन झाडू घ्यायला जात असाल तर शनिवारीच खरेदी करा. तसेच शनिवारी घरात नवीन केरसुणी खूप शुभ मानलं जातं, म्हणजेच जुना झाडू बदलायचा असेल तर तो शनिवारीच बदलावा.
-जेव्हाही तुम्ही नवीन घरात जाल तेव्हा नवीन केरसुणी घ्या, नवीन घर घ्या, नवीन केरसुणी घ्या. जुनी केरसुणी घरात दारिद्र्य आणू शकतो. 
-वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला केरसुणी ठेवणे सर्वात योग्य आहे, जर हे शक्य नसेल तर केरसुणी अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमची पटकन नजर जाणार नाही. 
-स्वयंपाक घरात आणि धान्याच्या ठिकाणी केरसुणी कधीच ठेवू नये. त्यामुळे आजारपण आणि दारिद्र्य येतं. 
-केरसुणीला कधीच जाळू नये त्याचे दुष्परिणाम होतात असं समजलं जातं. 
- रात्री घर झाडू नये चुकून अशी वेळ आली तर कचरा रात्री घराबाहेर फेकू नये. तो दुसऱ्या दिवशी टाकावा. 
-घरात केरसुणी कधीच उभी ठेवू नये,  
- कोणी जर घराबाहेर गेलं असेल तर ती व्यक्ती घरात आल्यावर कचरा काढू नये, ट
- केरसुणीला पाय लागल्याने अनादर होतो. त्यामुळे तिला नमस्कार करायला हवा.