Budh Gochar 2022: या 3 राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
बुध ग्रहाचं संक्रमण तीन राशींसाठी ठरणार लाभदायी, नोकरी ते पैसा होणार मोठा फायदा
मुंबई : प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर संक्रमण करत असतो. त्याचा इतर राशींवर परिणाम दिसतो. 2 जुलैपासून बुध ग्रह आपली रास बदलून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. याचा परिणाम काही राशींवर अत्यंत शुभ होणार आहे तर काही राशींना त्रास सहन करावा लागणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रह 2 जुलै 2022 रोजी सकाळी 9:40 वाजता गोचर करेल. मिथुन राशीचा अधिपती ग्रह बुध असून तो या राशीत भ्रमण करणार आहे. बुध ग्रहाचं मिथुन राशीतील संक्रमण कोणत्या राशीसाठी शुभ ठरणार याबद्दल जाणून घेऊया.
कन्या : या राशीच्या लोकांना स्थिरता मिळेल. त्यांच्या कामात यश मिळणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यावसायिक लोकांना नवीन व्यवसाय करण्याची संधी मिळेल. या दरम्यान तुमची निर्णय क्षमता विकसित होईल.
मकर : मेहनत करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल. पदोन्नती होऊ शकते. विवाहाचा उत्तम योग आहे. कामाच्या ठिकाणी चांगला फायदा होईल. करिअरमध्ये उत्तम संधी मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह : या राशीच्या लोकांना आर्थिक लाभाची शक्यता आहे. एवढेच नाही तर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकाल. नोकरीची चांगली संधी मिळेल. आपली कामं पूर्ण होतील.