Chanakya On Husband Wife: आचार्य चाणक्य हे त्यांच्या राजकीय धोरणांबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील धोरणं आणि सल्ल्यांसाठी आजही ओळखले जातात. आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध होते. आपल्या हयातीत वेगवेगळ्या विषयांवर सखोल आणि सविस्तर धोरणांची रचना करणाऱ्या चाणक्य यांची हीच धोरणं आता 'चाणक्य नीति' म्हणून ओळखली जातात. या धोरणांमध्ये आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाबद्दलही भाष्य केल्याचं आढळून येतं. चाणक्य यांनी सल्ला देताना पत्नीशी संबंधित अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या पती म्हणून कोणत्याही पुरुषाने चुकूनही इतर कोणाशीही शेअर करू नयेत.
पत्नीसंदर्भातील या गोष्टी जेव्हा एखादा पुरुष दुसऱ्या कोणासोबत शेअर करतो तेव्हा संपूर्ण जग त्याचा द्वेष करते. तसेच पत्नीबद्दल अशी माहिती जगजाहीर करणाऱ्या पुरुषांचा सार्वजनिक जीवनात केला जाणार सन्मान तसेच त्यांच्याप्रती वाटणारा आदरही हळूहळू कमी होऊ लागतो. चला तर मग पत्नीशी संबंधित या तीन गोष्टी नेमक्या आहेत तरी कोणत्या ज्याबद्दल वाच्यता करण्यापासून चाणक्य परावृत्त करतात. सविस्तरपणे या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
आयुष्यात कधीही तुमच्या पत्नीची नाराजी किंवा राग दुसऱ्या कोणासमोर सांगू नका, असं चाणक्य सुचवतात. जर एखाद्या अशा गोष्टी इतर कोणाला सांगितल्या तर लोक त्या व्यक्तीच्या पत्नीवर हसतातच पण या गोष्टी जगजाहीर करणारी व्यक्ती म्हणजेच पती सुद्धा हास्यास पात्र ठरतो, असा इशारा चाणक्य यांनी दिला आहे.
पतीने कधीही घरात आणि आयुष्यात सुरू असलेल्या वैयक्तिक दुःखांबद्दल आणि समस्यांबद्दल बाहेरील व्यक्तीला सांगू नये, असं चाणक्य नीती सांगते. जेव्हा एखादा पुरुष असं काही करतो तेव्हा त्याच्या त्रासाचा आणि दुःखांचाही फायदा घेतला जाऊ शकतो, असं 'चाणक्य नीति'मध्ये म्हटलं आहे.
आयुष्यात कधीही आपल्या किंवा आपल्या पत्नीच्या कमतरता इतर कोणासमोर सांगू नये, असं चाणक्य सुचवतात. अगदी चुकूनही ही गोष्ट करु नये असं चाणक्य सांगतात. जेव्हा एखादा पुरुष असं करतो तेव्हा दुसरी व्यक्ती त्याचा फायदा घेऊ शकते. काही वेळेस यामधून मोठं नुकसानही होऊ शकतं. जेव्हा एखादी व्यक्ती अशापद्धतीने जोडीदाराच्या कमकुवतपणाबद्दल चारचौघात बोलते तेव्हा त्या व्यक्तीचा आणि त्याच्या पत्नीचा आदरही कमी होतो.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)