Chandra Grahan 2026 : तब्बल 500 वर्षांनंतर होळी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आलं आहे. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अत्यंत अशुभ मानले जाते. ग्रहण काळात शुभ गोष्टी करण्यास वर्ज्य आहे. त्यामुळे यंदा रंगांची उधळण करायची की नाही, याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. धुलिवंदन 3 मार्च मंगळवारी चंद्रग्रहण असल्याने अनेक ठिकाणी रंगांचा सण 4 मार्चला साजरा करण्यात येणार आहे.
ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर सांगतात की, चंद्रग्रहण असल्याने 3 मार्च मंगळवारी ग्रहणाच्या 9 तासांपासून सूतक काळ असणार आहे. भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे, त्यामुळे सकाळी 6.20 वाजेपासून सुरु होणार आहे. या काळात मंदिर बंद असणार आहे. तरदुसरीकडे चंद्रग्रहण काळात एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यास काय करावे? विशेषतः, अंतिम संस्कार करावेत की नाही? धर्मशास्त्रात काय सांगितलंय जाणून घेऊयात.
चंद्रग्रहण 3 मार्च रोजी 18:16 वाजेपासून 18:46 वाजेपर्यंत असणार आहे. स्थानिक चंद्रग्रहणाचा कालावधी 30 मिनिटे 09 सेकंद असणार आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, ग्रहणाच्या वेळी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे आयुष्यात संकट येणार असं सांगितलं जातं. विशेषतः जर ग्रहणाच्या वेळी एखाद्याचा मृत्यू झाला तर या वेळी विशेष नियमांचे पालन करावे लागतात, असं सांगण्यात आलंय. या वेळी मृत्यू आत्म्याच्या कर्माशी आणि मागील जन्माच्या फळांशी संबंधित असतो, असं शास्त्रात सांगण्यात आलंय.
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी पूजा साहित्याला स्पर्श करणे देखील निषिद्ध मानले जाते. शिवाय, अंतिम संस्कार न करता अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याच्या मोक्षाच्या मार्गात अडथळा येतो, अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे. म्हणून, जर चंद्रग्रहणाच्या वेळी एखाद्याचा मृत्यू झाला तर ग्रहण संपल्यानंतरच अंतिम संस्कार करणे योग्य मानले जाते.
गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर मृतदेहाचे शक्य तितक्या लवकर दहन करावे असं सांगण्यात आलंय. केवळ ग्रहणामुळे अंतिम संस्कार करण्यास उशीर करणे शास्त्रानुसार स्वीकार्य मानले जात नाही. त्यामुळे ग्रहण असलं तरी अंतिम संस्कार करावेत. म्हणून, गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर मृतदेहाचे दहन करावे योग्य मानले जाते.
ज्योतिषांनुसार, जर एखाद्याचा ग्रहणकाळात मृत्यू झाला तर त्याचे शरीर स्वच्छ कापडाने झाकून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक मृतदेहाजवळ बसून मंत्र म्हणू शकतात किंवा देवाचे नाव घ्यावेत. मृताच्या डोक्यावर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शरीरावर गंगाजल देखील शिंपडावे. त्यानंतर, मृताच्या तोंडात तुळशीचे पान ठेवावे.
वैज्ञानिकदृष्ट्या, ग्रहण ही एक खगोलीय घटना असून एखाद्याचा मृत्यूवर किंवा अंत्यसंस्कारावर कोणताही परिणाम होत नाही. पण, परंपरा आणि सामाजिक श्रद्धेमुळे लोक ग्रहण संपेपर्यंत वाट पाहतात.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.