Horoscope 17 December : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष 


महत्त्वाच्या कामामध्ये आज तुम्हाला यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नफा कमवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.


वृषभ


तुम्ही आयुष्यात काही बदल करणार असाल तर तो तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे.


मिथुन


कुटुंबातील लोकांच्या मदतीने आज तुम्ही प्रत्येक मोठं काम पूर्ण करू शकणार आहात. तुमच्यावर कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. 


कर्क


कुटुंबात सुरू असलेली समस्या दूर होणार आहे. आजच्या दिवशी तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. जोडीदाराशी झालेला वादही आज मिटू शकतो.


सिंह


आजच्या दिवशी तुम्हाला रक्ताची नाती जपण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागू शकते. कोणालाही पैसे उधार देणं आज टाळा.


कन्या


आजच्या दिवशी कोणालाही न विचारता सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. नोकरीच्या तसंच कामाच्या ठिकाणी अहंकार बाजूला ठेवून काम करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल.


वृश्चिक


आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या आहाराची पूर्ण काळजी घ्या. कारण तुम्हाला पोटदुखीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.


धनू


कामाच्या ठिकाणी आजच्या दिवशी तुमच्या विरोधकांपासून सावध रहा. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. आजच्या दिवशी भूतकाळातील चुकांसाठी माफी मागावी लागू शकते.


मकर


आजच्या दिवशी घरातल्या तसंच जीवनात सुरू असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करावं लागू शकतं. संधी ओळखून तुम्हाला आज चांगला फायदा होणार आहे.


कुंभ


आजच्या दिवशी कोणताही निर्णय घेताना विवेकबुद्धीने घ्यावा लागेल. आज कोणाकडूनही पैशांसंबंधी माहिती मिळाल्यावर तुम्ही सावधगिरी बाळगा.


मीन


आर्थिक कामांमध्ये आजच्या दिवशी काही अडचणी येऊ शकतात. कुंटुंबातील व्यक्तीला दिलेलं वचन तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण करावं लागेल.