Horoscope : 7 जूनला निर्जला एकादशीला 'या' लोकांवर असणार विष्णुची कृपा, यशासोबत धनलाभाची संधी

सर्व 12 राशींसाठी हा दिवस कसा राहील, चला जाणून घेऊया ज्योतिषी प्रीतिका मजुमदार यांच्याकडून...  

नेहा चौधरी | Updated: Jun 6, 2025, 07:00 PM IST
Horoscope : 7 जूनला निर्जला एकादशीला 'या' लोकांवर असणार विष्णुची कृपा, यशासोबत धनलाभाची संधी

मेष (Aries Zodiac)   

एकादशीच्या दिवशी  ज्यांच्याशी संवाद साधाल त्यांना तुमचे विचार पटतील. एखाद्या वादावर आज तुम्ही तोडगा काढाल.

वृषभ (Taurus Zodiac) 

एकादशीच्या दिवशी कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. जास्तीत जास्त अडचणींवर मात कराल. 

मिथुन (Gemini Zodiac)

एकादशीच्या दिवशी गुंतागुंतीच्या परिस्थितीविषयी एखाद्या व्यक्तीशी संवाद साधा, तोडगा निघेल. ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण असेल.

कर्क (Cancer Zodiac)  

एकादशीच्या दिवशी आर्थिक व्यवहारांचा गांभीर्याने विचार कराल. नोकरीच्या ठिकाणी एखादं नवं काम तुम्हाला दिलं जाईल.

सिंह (Leo Zodiac) 

एकादशीच्या दिवशी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच महत्त्वाचे निर्णय घ्या. जास्तीत जास्त कामं पूर्ण होतील.

कन्या (Virgo Zodiac)    

एकादशीच्या दिवशी मित्रांसमवेत एखादा बेत आखाल. व्यवसायामध्ये नव्या संधी मिळतील. भावा-बहिणींसोबत सुरू असलेले मतभेद तुम्हाला चर्चेतून संपवावे लागतील.

तूळ (Libra Zodiac)  

या राशीच्या व्यक्तींनी एकादशी दिवस कायदेशीर बाबींमध्ये सावध राहावं. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या शिकवणी आणि सल्ल्याचे पालन करून तुम्ही चांगलं नाव कमवाल.

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

एकादशीच्या दिवशी तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल. 

धनु (Sagittarius Zodiac) 

एकादशीच्या दिवशी अपेक्षित लाभ मिळाल्यास आनंद होईल आणि त्यांचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी पूर्ण मेहनत आणि समर्पणाने काम करून तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना खूश कराल 

मकर (Capricorn Zodiac)   

एकादशीच्या दिवशी तुम्ही दिलेली कोणतीही जबाबदारी वेळेत पूर्ण कराल. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा घ्याल.

कुंभ (Aquarius Zodiac) 

एकादशीच्या दिवशी जुने वाद आज संपुष्टात येतील. कामात हुशारी दाखवा त्यातून खूप नफा येत्या काळात होणार आहे. 

मीन  (Pisces Zodiac)  

एकादशीच्या दिवशी कुटुंबासोबतची काम तुम्हाला करावी लागतील. कोणत्याही कठीण गोष्टी सोडवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)