Dev Uthani Ekadashi 2023 : ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला|


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

                                              थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला||
हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला कार्तिक एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू 148 दिवसानंतर निद्रेतून जागे होतात. या दिवशी चातुर्मास संपून विष्णूसह सर्व देव जागृत होतात. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते. याकाही ठिकाणी या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असंही म्हणतात.  तर पंढरपुरात कार्तिकी यात्रेचा (kartiki wari) सोहळा साजरा होतो. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल होता. (dev uthani ekadashi 2023 3 shubh yog muhurta puja vidhi and significance of kartiki ekadashi pandharpur)


देवउठनी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी तिथी 


देवउठनी एकादशी 22 नोव्हेंबरला रात्री 11.03 वाजता सुरु झाली असून 23 नोव्हेंबरला रात्री 09.01 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे गुरुवार, 23 नोव्हेंबरला देवउठनी एकादशीचे व्रत आहे. तर 24 नोव्हेंबरला सकाळी 6.00 ते 08.13 या वेळेत व्रत सोडण्याचा शुभ मुहूर्त आहे. 


देवउठनी एकादशी शुभ संयोग 


कार्तिकी एकादशीला महालक्ष्मी योगासह सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आहे. या शुभ योगामुळे काही राशींच्या लोकांवर भगवान विष्णूचा विशेष आशिर्वाद लाभणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Mahalaxmi Yoga : देवउठनी एकादशीला महालक्ष्मी योग! 148 दिवसानंतर निद्रेतून उठणारे विष्णूदेव 'या' लोकांना करणार श्रीमंत


देवउठनी एकादशी पूजा कशी करायची?


पहाटे स्नान झाल्यावर दिवसभर व्रत करावे. भगवान विष्णूचं स्मरण करत पूजा करा. भगवान विष्णूंना शंख आणि घंटा वाजवून त्यांना झोपेतून जागे करावं. यानंतर भगवान विष्णूसमोर दिवा आणि उदबत्ती लावून पूजा करा. त्यानंतर त्यांना फळं, फुलं आणि भोग अर्पण करा. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशीचा नैवेद्य शुभ मानलं जातो. दुसऱ्या दिवशी व्रत सोडल्यावर गोर गरीब आणि ब्राह्मणांना अन्न दान करा. 


कार्तिक एकादशीची पूजा विधी व्हिडीओ



या मंत्राचा जप करा!


'उत्तिष्ठोतिष्ठ गोविंद त्यज निद्राम जगत्पट्टे'.सत्वर सुप्ते जगन्नाथ जगसुप्तमिदं भवेत् ।उत्तमोत्तिष्ठ वराह नारायण ।हिरण्यक्ष प्राण घटीं त्रैलोक्ये मंगलम् कुरु ।



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)