Vasubaras 2025 : 17 ऑक्टोबरपासून वसुबारसने दिवाळीला सुरुवात, जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व

Vasubaras 2025 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस, शुक्रवारी 17 ऑक्टोबरला दिवाळीची पहिली पणती ही गायवासरुच्या नावाने लागणार. यादिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 16, 2025, 01:54 PM IST
Vasubaras 2025 : 17 ऑक्टोबरपासून वसुबारसने दिवाळीला सुरुवात, जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व

Vasubaras 2025 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी... प्रकाशाचा हा सण प्रत्येकासाठी उत्साहाचा असतो. एकत्र पाच सणाचा हा दिवाळीचा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. दिवाळीचा पहिला सण आणि पहिली पणती ही वसुबारस सणाने होणार आहे. प्रत्येक सणाचे आपलं असं महत्त्व आहे. वसुबारस हा सण ग्रामिण भागात जास्त प्रमाणात साजरा करण्यात येतो. शेतकरी घरांमध्ये गाय वासरू असल्याने यादिवशी पुरण पोळीचा नैवेद्य केला जातो. शहरात या सणाला गाय वासराच्या मूर्तीचा पूजा करण्यात येते. चला तर मग  यादिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या.

Add Zee News as a Preferred Source

वसुबारस कधी आहे?

हिंदू पंचांगानुसार आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी याच दिवशी वसुबारस सण साजरा करण्यात येतो. यंदा वसुबारसचा सण शुक्रवारी 17 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. 

प्रदोषकाल मुहूर्त: दुपारी 04:14 ते संध्याकाळी 07:43 पर्यंत
द्वादशी तिथी आरंभ- 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.12 वाजेपासून
द्वादशी तिथी समाप्ती: 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.18 मिनिटाला

हेसुद्धा वाचा - Dhanteras 2025 : धनत्रयोदशी 18 की 19 ऑक्टोबर कधी? जाणून घ्या तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व

वसुबारस का साजरी करावी?

प्राचीन काळापासून भारतीय लोक गायीला पवित्र आणि पूजनीय मानतात. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देव वास करतात असे म्हटलं जातं. त्यामुळे प्राचीन काळापासून गोमातेची पूजा करण्याची परंपरा आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गो सेवा करुन तिचं महत्त्व मानलं आहे. श्रीकृष्णाने तर स्वत:ला गोपाल म्हणून घेतलं गेलं आहे. एवढंच नाही तर दानात गोदान हे सर्वाश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. शास्त्रात सांगितलं की, पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे गाय. याचा अर्थ गायीपासून पाच वस्तू म्हणजे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र याला महत्त्व आहे.

कोणत्या गायीची पूजा करावी?

वसुबारसला घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवत्स धेनुची पूजा करण्यात येते. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी महिला या दिवशी उपवास करतात. गावाकडे ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत, त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य गायीची पूजा करण्यात येते. यादिवशी गहू आणि मगू खाऊ असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलंय. शिवाय यादिवशी महिला बाजरीची भाकरी आणि गवारच्या शेंगांची भाजीवर उपवास सोडतात.  

वसुबारसची पूजा विधी जाणून घ्या!

हा सण माय लेकाच्या नात्याची पूजा म्हणून पाहिली जाते. म्हणून काही ठिकाणी महिलांचा या दिवशी मुलांसाठी उपवास करतात. वसुबारला घरासमोर रांगोळी काढा. घरातील गाय वासरू यांना आंघोळ घाला. शहरात घरात गाय वासराची मूर्ती असेल त्याची पूजा करा. अभिषेक करुन नवी वस्त्रं घाला. ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार, गहू, मूग खाले जात नाही. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावं आणि सुख लाभावं म्हणून वसुबारसची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करा.

या दिवशी काय करू नये?

गोवत्स एकादशीला गहू मूग खाल्ले जात नाहीत.
दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत
तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य आहे.

या दिवशी काय करावे?

 या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते.
 घरी गुरे, वासरे असणार्‍यांकडे ह्या दिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक केला जाते. त्याचा नैवेद्य दाखवला जातो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More