Saturn And Jupiter 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचं ठराविक काळानंतर गोचर होतं. ग्रहांच्या या गोचरचा परिणाम प्रत्येक राशींच्या आयुष्यावर होत असतो. गुरू, राहू आणि गुरूच्या राशीतील बदलाचा 12 राशींच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव पडतो. यावेळी राहू मीन राशीमध्ये स्थित आहे. तर गुरु मेष राशीत आणि शनि कुंभ राशीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 एप्रिलपर्यंत शनी राहूच्या शताभिषा नक्षत्रात प्रवेश असणार आहे. यानंतर ते गुरूच्या पूर्वाभद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत शनि आणि गुरू दुहेरी परिणाम देण्यास तयार आहेत. शनी आणि गुरू कोणत्या राशींच्या आयुष्याच चांगला काळ घेऊन येणार आहे, ते पाहुयात.


मिथुन रास (Mithun Zodiac)


या राशीमध्ये शनी भाग्याच्या घरात, राहू कर्माच्या घरात आणि देवगुरु गुरु लाभाच्या घरात आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. सरकारी आणि राजकारणातील उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होणार आहेत. तुमचा निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे. तुम्ही देश-विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. यश मिळाल्यास भरपूर आर्थिक फायदा होईल. 


सिंह रास (Leo Zodiac)


देवगुरु गुरू आणि शनीची दृष्टी नवव्या भावात म्हणजेच भाग्याच्या घरी पडत आहे. नशिबाने साथ दिली तर तुमचे बिघडलेले काम पूर्ण होणार आहे. तुमच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग मिळवू शकता. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होणार आहे. तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. मन शांत राहणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. घाईघाईने घेतलेले चुकीचे निर्णय सुधारण्याची संधी मिळेल.  तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. निर्णय घेण्याची ताकद वाढेल. 


धनु रास (Dhanu Zodiac)


या राशीच्या लोकांनाही भरपूर फायदा होणार आहे. देवगुरू सहाव्या भावात गेल्याने 30 एप्रिलनंतर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यही चांगले राहील. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. समाजात मान-प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )