मेष - या राशींच्या व्यक्तींना भाऊ आणि मित्रपरिवाराकडून मदत मिळेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. संपत्तीच्या कामकाजावर लक्ष द्या. कोणताही व्यवहार करताना समजून निर्णय घ्या. आरोग्याची काळजी घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन- नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप जास्त असेल. जास्त मेहनतही करावी लागू शकते. दिवस जास्तीत जास्त कामांमध्ये व्यतीत होईल. सावध राहा. 


कर्क- व्यावसायिक दृष्टीकोन ठेवा. नवं काम मिळेल. मेहनतीचं फळ मिळेल. नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी आहे. 


सिंह- नोकरदार आणि व्यावसायिक वर्गासाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांची मदत करा. धनलाभ होईल. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. दिवसही चांगला असेल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. 


कन्या- कामाच्या ठिकाणी काहीसे चढउतार जाणवतील. आर्थिक व्यवहारांमध्ये अनपेक्षित नुकसान होईल. त्यामुळे या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. दैनंदिन कामांमध्ये अडचणी येतील. 


तुळ- व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. वरिष्ठांची मदत मिळेल. व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत तुम्ही एखादं चांगला निर्णय घ्याल. ज्या प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत आहात ती उत्तरं आज तुम्हाला मिळतील. 


वृश्चिक - कामाकाजात फायदा होणार आहे. दीर्घकाळासाठी चालणारी एखादी योजना आखाल. येत्या दिवसांमध्ये तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. 


धनु- व्यवसायामध्ये सावधगिरीने काम करा. कामकाजाच्या वाढत्या व्यापामुळे नोकरदार वर्गात जास्त तणाव असेल. कोणत्याही कामासाठी संकोचलेपणा नको. 


मकर- कामाच्या बाबतीत तणाव वाढेल. कोणत्याही व्यवसायाच्या बाबतीत तणाव घेऊ नका. आव्हानं स्वीकारा. अतिउत्साहात कोणतंही चुकीचं काम करु नका. 


कुंभ- अडकलेली कामं पूर्ण होतील. स्वत:वर विश्वास ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. प्रेमसंबंध आणखी दृढ करण्याता प्रयत्न करा. यश मिळेल. 


मीन- कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे. योजनाबद्ध पद्धतीने कामं करा. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. अचानक एखाद्या व्यक्तीकडून मदत होणार आहे.