Makar Sankranti 2026 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाची आपली अशी वैशिष्ट्य असून त्यामागे प्रथा परंपरा असते. भारतात नवविवाहित जोडप्याचे पहिल्या वर्षातील सगळे सण मोठ्या उत्साहाता साजरी करण्यात येते. लग्नानंतर प्रत्येक सणाला खास प्रथा असते. तुमचं नुकतच लग्न झालं असेल आणि पहिला मोठा सण हा मकर संक्रांत येणार असेल तर तो सण साजरा करावा की नाही, याबद्दल संभ्रम आहे. जुनी लोक सांगतात की, लग्नानंतर पहिला सण म्हणून मकर संक्रांत नवविवाहितीने साजरा करु नये. याबद्दल ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे, जाणून घेऊयात.
ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात की, लग्नानंतरचा पहिलीच संक्रांत येत असेल, तर परंपरेनुसार ती साजरी करु नये. त्याऐवजी सासरच्यांकडून सर्व वाण-वस्तू घेऊन माहेरी जावं. तर पुढच्या वर्षी संक्रांत साजरी करावी. शास्त्रानुसार असं म्हणतात की, लग्नानंतर पहिली संक्रांत सासरी साजरी केल्यास अखंड सौभाग्यासाठी अशुभ मानली जाते. धार्मिक श्रद्धांनुसार ही प्रथा नवविवाहितेच्या वंशासाठी आणि अखंड सौभाग्यसाठी मकर संक्रांत साजरी करणे चुकीचे मानले जाते.
धर्मशास्त्रात असं मानलं गेलं आहे की, संक्रांत म्हणजे संकट या शब्दावरून पहिला सण संक्रांत सासरी साजरा करुन सगळ्या सणावर संक्रांत आणू नये, अशी मान्यता आहे. त्यामुळे लग्नानंतर पहिला सण संक्रांत असल्यास ते माहेरी जाऊन केल्यास वंशाला सुरुवात होते आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, असा विश्वास आहे.
धर्मशास्त्रानुसार नवविवाहितने सासरहून संपूर्ण वाणाचे सामान म्हणजे वस्त्रे, दागिने सौभाग्याचे लेणे घेऊन माहेरी जावं. पहिली संक्रांत सासरी न साजरी करता माहेरी साजरी करावी. त्यानंतर पुढच्या वर्षी मकर संक्रांत सासरी आणि माहेरीही पण तुम्ही साजरी करु शकता. नवविवाहित जोडपे काळ्या रंगाचे कपडे घालून तिळवा साजरा करण्यात येतो.
आजही अनेक घरांमध्ये ही परंपरा मानली जाते. तर काही लोक याला केवळ एक सण म्हणून आनंदाने तो साजरा करतात. खरं तर कुठलीही प्रथा पाळणे ही पूर्णपणे वैयक्तिक श्रद्धा आणि कुटुंबाच्या परंपरेवर अवलंबून असते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा झी 24 तासशी कोणताही संबंध नाही तसेच आम्ही याला दुजोरा देत नाही.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 231/5
|
VS |
SA
201/8(20 ov)
|
| India beat South Africa by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.