Garud Puran : हिंदू धर्मात, व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याच्या शांतीसाठी तेरा तर कुठे 14 दिवस अनेक धार्मिक विधी करण्यात येतात. त्यातील तेराव्या किंवा चौदावीला व्यक्तीच्या मृत्यूच्या शांतीसाठी ब्रह्मभोजन आयोजन करण्यात येते. ही हिंदू धर्मातील अतिशय प्राचीन प्रथा असून आजही ही परंपरा पाळली जाते. या विधीला हिंदू धर्मात मृत्यूभोज असंही म्हटलं जातं. या भोजणासाठी नातेवाईकांसह प्रियजनांना आमंत्रण दिलं जातं. या भोजणासाठी जाण्याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तेरवी किंवा चौदावीचं जेवण ग्रहण करणे शुभ की अशुभ, म्हणजे जे जेवण करणे योग्य की अयोग्य असतं का? याबद्दल गरुड पुराण आणि गीतेमध्ये श्रीकृष्णाने काय सांगितलं आहे पाहूयात.
हिंदू धर्मानुसार, 16 संस्कारांपैकी एक असतो तो म्हणजे अंतिम संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. शास्त्रानुसार बाराव्या दिवशी फक्त ब्राह्मणांनाच मेजवानी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. सनातन धर्मात मृत्यूभोजनाची परंपरा नाही. फक्त ब्राह्मणांना आपल्या क्षमतेनुसार जेवण दिलं जातं आणि मृताच्या आत्म्याच्या शांतीसाठी दान करा असं म्हटलं गेलं आहे. याला ब्रह्मभोजन असं म्हटलं गेलं आहे.
गरुड पुराणात असं सांगितलं गेलं आहे की, मृत्यूनंतर आत्मा तेराव्या दिवसापर्यंत कुटुंबातील सदस्यांसोबत वास्तव करत असतो. त्यानंतर त्याचा दुसऱ्या जगात प्रवास सुरू होतो. असं म्हटलं जातं की मृत आत्म्याला तेराव्या दिवशी अन्न पुरवण्याचे पुण्य करण्यात यावे. यामुळे मृत आत्म्याचे मरणोत्तर जीवन सुधारण्यास मदत होते अशी मान्यता आहे. गरुड पुराणानुसार, मृत्यूभोज फक्त गरीब आणि ब्राह्मणांसाठी करण्यात यावे. गरजू लोकही ते खाऊ शकतात पण जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीने ते खाल्ले तर ते गरिबांचा हक्क हिसकावून घेण्यासारखे गुन्हा केल्याचा मानलं जातं.
एका तज्ज्ञाच्या मते, मृत्यूनंतर दशम, एकादशी आणि द्वादशाच्या दिवशी विधी केले जातात. दहाव्या दिवशी घर स्वच्छ करुन शुद्ध करण्यात येतं. ज्याला दशागात्र म्हणतात. एकादशा गात्राच्या दिवशी पिंडदान आणि महापात्र दान विधी करण्यात येतो. त्यानंतर मासिक पिंडदान, द्वादशाला पूर्वजांसाठी पिंडदान करण्यात येतो. घरात गंगाजल इत्यादी शिंपडले जातं. त्यानंतर तेराव्या दिवशी, घरी 13 किंवा 16 पंडित, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांसह सामूहिक भोजन आयोजित करण्यात येतं. ज्याला मृत्युभोज अलं म्हटलं जातं. तेराव्या दिवशी, फक्त गायत्री मंत्र जपणाऱ्या ब्राह्मणांना, म्हणजेच विद्वान आणि तपस्वी ब्राह्मणांनाच जेवण देण्याची प्रथा आहे. ब्राह्मण कच्चा माल घेऊन स्वतःचे अन्न शिजवत असत. वैदिक परंपरेनुसार, नातेवाईक त्यांच्या क्षमतेनुसार मृताच्या घरी पोहोचत असत, त्यांच्या घरातून धान्य, रेशन, फळे, भाज्या, दूध, दही, मिठाई, कपडे इत्यादी घेऊन जात असत. त्या नातेवाईकांना जेवणही दिले जात असे आणि त्यांना स्मृतिचिन्हेही दिली जात होती जेणेकरून मृताच्या मृत्यूनंतरही त्याचे नातेवाईक कुटुंबाशी जोडलेले राहू शकतील. पण आता परिस्थिती बदलली आहे. या प्रथा विकृत झाल्या आहेत आणि त्यांचा गैरसमज होत आहे. जवळजवळ सर्व तज्ज्ञांच्या मते, अंत्यसंस्काराच्या मेजवानीवर लाखो खर्च करणे आणि हजारो लोकांना जेवू घालणे हे शास्त्रानुसार नाही. अंत्यसंस्काराचा मेजवानी फक्त जवळच्या आणि गरजूंसाठी आयोजित केला पाहिजे.
महाभारतातील अनुशासन पर्वानुसार, अंत्यसंस्काराचे जेवण खाल्ल्याने व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम होतो. अंत्यसंस्काराचे जेवण खाणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा नष्ट होते. अंत्यसंस्काराच्या मेजवानीत जेवण करणे योग्य आहे की नाही, याचे उत्तर महाभारतातील एका घटनेत सापडते. या घटनेनुसार, महाभारताचे युद्ध सुरू होणार होते. युद्ध टाळण्यासाठी, भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या घरी गेले आणि त्याला करार करण्याची विनंती केली आणि दुर्योधनला युद्ध न लढण्याचा प्रस्ताव दिला, पण दुर्योधनाने श्रीकृष्णाचे ऐकले नाही. यामुळे श्रीकृष्णाला खूप वाईट वाटलं. ते तेथून निघून गेले. जाताना, दुर्योधनाने श्रीकृष्णाला जाण्यापूर्वी अन्न ग्रहण करण्यास सांगितले, पण श्रीकृष्णाने नकार दिला. दुर्योधनाला याबद्दल वाईट वाटले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले - सम्प्रीति भोज्यानि आपदा भोज्यानि वा पुनै: - म्हणजेच, अन्न तेव्हाच खावे जेव्हा जेवण देणारा आनंदी असेल आणि जेवणारा आनंदी असेल.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
HUN
(19.2 ov) 149
|
VS |
FRA
97(15.3 ov)
|
Hungary beat France by 52 runs | ||
Full Scorecard → |
MLT
(20 ov) 148/9
|
VS |
AUT
101(17.5 ov)
|
Malta beat Austria by 47 runs | ||
Full Scorecard → |
BEL
(8 ov) 141/1
|
VS |
ROM
78/6(8 ov)
|
Belgium beat Romania by 63 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.