Kharmas 2025 : हिंदू धर्मात, सूर्याला नऊ ग्रहांचा राजा आणि आत्म्याचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, दर महिन्याला सूर्य देव एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतो, ज्याला 'संक्रांती' असं म्हटलं जातं. वर्षातून दोनदा, जेव्हा सूर्य देव गुरु राशी धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्या 30 दिवसांच्या कालावधीला 'खरमास' किंवा 'मलमास' म्हटलं जातं. या काळात सर्व शुभ करण्यास मनाई असते. ज्योतिषशास्त्रीय आणि पौराणिक कारणांमुळे शुभ कामांसाठी खरमास का निषिद्ध मानला जातो. तुम्हाला माहितीये का पुढील 30 दिवस अशुभ का मानले जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार धनु आणि मीन राशीवर देवगुरू गुरु, धार्मिकता आणि शुभ ग्रहाचे राज्य असतं. जेव्हा सूर्य त्याच्या गुरुच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा तो "विश्रांतीच्या" स्थितीत प्रवेश करतो, असं शास्त्रात सांगितलं जातं.
तर जेव्हा सूर्य धनु किंवा मीन राशीत असतो तेव्हा त्याचे तेज आणि शक्ती कमी होतं. कोणत्याही शुभ कार्यासाठी सूर्याची पूर्ण शक्ती आणि तेज आवश्यक असते. कमकुवत सूर्यामुळे हाती घेतलेल्या कामात यश आणि शुभतेचा अभाव असतो असे मानलं जातं.तसंच गुरुच्या प्रभावामुळे, हा काळ आत्मशुद्धी, चिंतन आणि धार्मिक विधींसाठी चांगला मानला जातो. पण भौतिक सुखांसाठी किंवा नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी अनुकूल मानला जात नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, खरमास दरम्यान नवीन घरात जाणे किंवा बांधकाम सुरू करणे देखील टाळावे.
मुंडन/कर्णवेध: मुलांशी संबंधित कोणतेही शुभ विधी करू नयेत.
नवीन व्यवसाय/काम सुरू करणे: कोणतीही मोठी गुंतवणूक करणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जात नाही.
देवतांची स्थापना: कोणतेही नवीन मंदिर किंवा मूर्ती स्थापन करू नये.
खरमास दरम्यान शुभ कार्ये थांबवली जात असली तरी, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो.
उपासना: भगवान विष्णू, गुरु बृहस्पती आणि सूर्यदेवाची पूजा करणे खूप फायदेशीर आहे.
दान: या संपूर्ण महिन्यात, गरीब आणि गरजू लोकांना पिवळे कपडे, धान्य, गूळ, गहू, तूप आणि तीळ दान करावे.
जप आणि ध्यान: हा काळ आत्मशुद्धी आणि ध्यानासाठी सर्वोत्तम आहे. "ॐ नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा जप करणे फलदायी आहे.
पवित्र स्नान: पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते.
सूर्याला अर्घ्य अर्पण करा: दररोज पाण्यात लाल चंदन आणि लाल फुले घालून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.
खरमास दरम्यान 3 राशींना सावधगिरी बाळगावी लागेल
वृषभ राशीसाठी खरमासाचे 30 दिवस त्रासदायक ठरणार आहे. काहींना बहुतेक प्रयत्नांमध्ये अपयश येणार आहे, तर काहींना त्यांच्या आरोग्याची चिंता राहणार आहे. शिवाय, घरात जुने वाद पुन्हा उद्भवू शकणार आहेत. खरमास दरम्यान, नवीन काहीही खरेदी करू नका किंवा कोणत्याही शुभ कार्याची योजना आखू नका.
खरमास दरम्यान शुक्र आणि बुध यांचे भ्रमण मकर राशीच्या लोकांसाठी विशेषतः चांगले नसणार आहे. तुम्ही क्षुल्लक गोष्टींवरून भावनिक व्हाल, ज्याचा फायदा कोणीतरी घेणार आहेत. खराब आरोग्याने ग्रस्त असलेल्यांनी मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न करावा. खरमास दरम्यान स्थावर मालमत्तेचे व्यवहार करणे शुभ ठरणार नाही.
या वेळी मीन राशीसाठी शुक्र आणि बुध यांचे भ्रमण शुभ राहणार नाही. जर तुम्ही तुमच्या भावना आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर चांगले संबंधही बिघडू शकतात. खरमास दरम्यान नवीन काहीही खरेदी करणे टाळा आणि बचत करण्याकडे विशेष लक्ष द्या.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.