)
Kojagiri Purnima : पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देतो. आश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी ही शरद पौर्णिमा म्हणून पण ओळखली जाते. आज कोजागिरी पौर्णिमा असून हिंदू धर्मात या दिवशी चंद्राचे दर्शन आणि पूजा केल्याने अत्यंत शुभ मानले जाते. या वर्षी शरद पौर्णिमेला वृद्धी योग देखील होईल आणि चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. चंद्र हा जल तत्वाचा ग्रह मानला जातो आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मीन राशीत त्याची उपस्थिती काही राशींना भाग्यशाली ठरणार आहे. तीन राशीचे आजपासून अच्छे दिन सुरु होणार आहे, त्या तीन राशीत तुमची रास आहे का, जाणून घ्या. (Kojagiri Purnima Sharad Purnima 2025 Progress and success with financial benefits for people of 3 zodiac signs)
कर्क रास
या राशीसाठी कोजागिरी पौर्णमा हा एक अतिशय खास दिवस असणार आहे. शरद पौर्णिमेनंतर तुमच्या प्रेम आणि वैवाहिक संबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहे. भागीदारी व्यवसायात तुम्हाला नफा देणार असणार आहे. चंद्राच्या प्रभावामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. काही लोकांना त्यांच्या करिअरमध्ये पदोन्नती मिळणार आहे.
वृश्चिक रास
रहस्यमय वृश्चिक राशीत जन्मलेल्यांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा सण शुभ सिद्ध होणार आहे. पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येणार आहे. तुमच्या पाचव्या भावात चंद्राची उपस्थिती तुम्हाला शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक अनुभव देणार आहे. या काळात या राशीत जन्मलेल्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळणार आहे. त्यांच्या संपत्तीतही वाढ पाहिला मिळणार आहे.
मीन रास
शरद पौर्णिमा आणि त्यानंतरचा काळ मीन राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. तुम्हाला मानसिक चिंतांपासून मुक्तता मिळणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या पालकांचे आशीर्वाद आणि पाठिंबा मिळणार आहे. या काळात तुमच्या संचित संपत्तीत वाढ होताना दिसणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांना इच्छित नोकरी प्राप्त होणार आहे. तुम्हाला समाजात आदर आणि सन्मान मिळणार आहे.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)