Makar Sankranti 2026 : मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला सण असून तो देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात मकर संक्रांत साजरी करण्याची वेगळी परंपरा आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला विवाहित महिला सुगड पूजा करतात. तसंच रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू सोहळ्याचं आयोजन करतात. ज्या लग्नानंतर विवाहित जोडप्याचा मकर संक्रांती सण हा तिळवा म्हणून साजरा करण्यात येतो. तर लहान मुलांचं बोरन्हाण घालण्यात येतं. तुमच्या घरातही 5 वर्षांपर्यंत मुलं असेल तर मकर संक्रांतीला बोरन्हाण घालण्याची प्रथा असेल, तर जाणून घ्या या प्रथेमागील कारण आणि कसं घालतात बोरन्हाण?
महाराष्ट्रात मकर संक्रांतीत लहान मुलांचा कौतुकाचा संस्कार म्हणून बोरन्हाण घातलं जातं. यात 1 ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या डोक्यावरून बोरं, ऊस, शेंगा, मुरमुरे, बत्तासे, बिस्किट आणि चॉकलेट खाली टाकलं जातं. हे सगळं साहित्य लहान मुलं गोळ्या करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भात याला लूट असंही म्हटलं जातं.
बोरन्हाण करण्यामागे कारणं म्हणजे थंडीच्या दिवसात मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी आणि त्यांना आरोग्य लाभावं म्हणून केलं जातं. तसंच सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक मानलं जातं. या सोहळ्याच्या वेळी लहान मुलांनाही काळे कपडे परिधान करुन हलव्याचे दागिने घातले जातात. हा शिशूसंस्कार मुलांच्या जन्मापासून वयाच्या 5 वर्षांपर्यंत मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केला जातो.
धर्मशास्त्रात या बोरन्हाण प्रथेमागे एक आख्यायिका सांगण्यात आली आहे. ही कथा अशी आहे की, करी नावाचा राक्षस होता. या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून ही प्रथा केली जाते. पौराणिक काळात बोरन्हाण बाळ गोपाळाची करण्यात आली होती. लहान मुलांनाही बाळगोपाळाचे रुप मानलं जातं. त्यामुळे राक्षसापासून लहान मुलांचं संरक्षण करण्यासाठी ही प्रथा आजही पाळली जाते.
औक्षणासाठी हळद-कुंकू, तुपाचे निरांजन, सुपारी, सुवर्णमुद्रा, अक्षता आणि कापूस. लहान मुलांसाठी काळा फ्रॉक किंवा काळा कुर्ता आणि हलव्याचे दागिने. तसंच बोरं, ऊस, शेंगा, मुरमुरे, बत्तासे, बिस्किट आणि चॉकलेट आणा.
या सोहळ्यासाठी घरातील आणि आजूबाजूच्या लहान मुलांना बोलवा. पाट किंवा चौरंगावर नवीन काळे कपडे घालून लहान मुलाला बसवा. त्यानंतर त्यांचं औक्षवान करा. मग त्यांच्या डोक्यावरून बोरं, ऊस, शेंगा, मुरमुरे, बत्तासे, बिस्किट आणि चॉकलेट घाला. त्यावेळी लहान मुलांना हे साहित्य लुटण्यास सांगा. शिवाय हे साहित्य टाकताना म्हणा की, बाळावर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे. तो सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होउ दे. तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा सोहळा करताना लहान मुलांना इजा होऊ नये म्हणून काळजी घ्या.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा झी 24 तासशी कोणताही संबंध नाही तसेच आम्ही याला दुजोरा देत नाही.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 231/5
|
VS |
SA
201/8(20 ov)
|
| India beat South Africa by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.