Mangal Ast : हे वर्ष सरायला आणि नवीन वर्ष सुरु होण्यास फक्त दोन महिने बाकी आहेत. अशात अनेक ज्योतिषशास्त्र नवीन वर्षाबद्दल भाकीत सांगत आहेत. येणारं वर्ष कोणत्या राशीसाठी शुभ तर कोणत्या राशीसाठी अशुभ ठरणार आहे, याबद्दल सांगितलं आहे. नवीन वर्षातील ग्रह आणि नक्षत्रांचा अभ्यास करुन भाकीत करण्यात आलं आहे. येणारं नवीन वर्ष 2026 हे पाच राशीच्या लोकांसाठी संकटाचे असणार आहे. 2026 मधील पहिले चार महिने हे संकटाचे असणार आहे. कारण नोव्हेंबर 6 ला मंगळ हा ग्रह अस्त झाला आहे. मंगळ स्वगृही वृश्चिक राशीत अस्त झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाची अस्त स्थिती ही अशुभ मानली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांसाठी, मंगळाच्या अस्तामुळे त्यांच्या करिअरमध्ये कठोर परिश्रम करण्याची वेळ येणार आहे. तरीदेखील तुम्हाला मेहनतीचे फळ मिळणार नाही. तर व्यवसाय मालकांना नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यासाठी या लोकांनी हुशारीने निर्णय घ्यावे, असा सल्ला देण्यात येतो. उत्पन्न वाढवण्याच्या संधी अधूनमधून येतील पण पैसा हातात टिकणार नाही. पती-पत्नीमधील संबंधामध्ये तणाव येणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांसाठी, मंगळाच्या अस्तामुळे अनेक अप्रिय घटना त्यांच्या आयुष्यात 4 महिने घडणार आहे. तुम्ही दिखाव्यासाठी अनावश्यकपणे पैसे वाया घालणे तुमच्यासाठी संकटाचे दार उघडणार आहात. तुम्ही आजारांवर पैसे खर्च होणार असल्याने अस्वस्थ असणार आहात. एखाद्याशी वाद होणार असल्याने आत्मसंयम बाळगा.
ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीचा स्वामी मंगळ या राशीत अस्त होत असल्याने या लोकांसाठी तो सर्वाधिक घातक ठरणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांना चिंतेत टाकणार आहे. प्रगतीत अडथळेच अडथळे येणार आहेत. अनावश्यक खर्च निर्माण होणार आहेत.. पाठदुखीची समस्या राहणार आहे. राग आणि चिडचिड गोष्टी बिघडवणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. चार महिन्यात अनेक संकटाचा सामना करावा लागणार आहे. एखाद्याशी वाद होणार असून त्यातून तुम्हाला मानसिक त्रास होणार आहे. जुने वाद पुन्हा उद्भवणार आहेत. व्यावसायिकांनाही अडचणी येणार आहेत. एवढंच नाही तर या लोकांच्या कुटुंबात समस्या निर्माण होणार आहेत.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More
LIVE|
SA
175/6(20 ov)
|
VS |
IND
68/6(9.5 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.