विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामुळे नीम करोली बाबा खूप चर्चेत आले आहे. त्यानंतर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनीही नीम करोली धामला भेट दिल्यामुळे लोक त्याकडे आकर्षित झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये नीम करोली धामचं महत्त्व वाढलंय. नीम करोली बाबांनी त्यांच्या भक्तांसाठी अनेक उपाय सुचवले आहेत, ज्यामुळे त्यांचे आयुष्य सुधारण्यास मदत मिळते आणि त्यांना आयुष्यात योग्य मार्गाकडे वाटचाल करणे सोपं जातं. नीम करोली बाबा हे 20 व्या शतकातील महान संतांपैकी एक मानले गेले आहेत. (Neem Karoli Baba says this power of Brahma Muhurta brings wealth Brahma Muhurta remedy in marathi)
नीम करोली बाबांच्या चमत्कारांबद्दल लोकांमध्ये अनेकदा चर्चा पाहिला मिळाली आहे. नीम करोली बाबांनी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी अद्वितीय शक्तींबद्दल सांगितलं आहे. खरंतर, त्यांनी सांगितलं की ब्रह्म मुहूर्तावर एक विशेष काम केल्याने जीवनातील पैशाशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यात मदत मिळते.
नीम करोली बाबा यांनी सांगितलं की, आपण नेहमी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठले पाहिजं. पंचांगानुसार ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.00 ते 5.30च्या दरम्यान असतो. अशा परिस्थितीत, आपण या वेळेच्या दरम्यान जागे झाले पाहिजे. नीम करोली बाबा म्हणतात की ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी विश्वाची संपूर्ण ऊर्जा पृथ्वीवर पडत असते, जी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी जागे होणाऱ्या व्यक्तीसाठी फायदेशीर मानली गेली आहे. ब्रह्मांडातील उर्जेचा हा साठा ब्रह्मा मुहूर्तावर जागे होणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होतो. त्याचे शरीर आणि आंतरिक मन बदलतं, ज्यामुळे त्याची कार्यशैली देखील सुधारण्यास मदत मिळते. त्याची झोपण्याची आणि समजून घेण्याची क्षमता सुधारण्यास मदत मिळते.
नीम करोली बाबा यांच्या मते, ब्रह्म मुहूर्तावर जागे झाल्यानंतर, आपण ध्यान करून आपल्या अंतर्मनाचा अनुभव घेतला पाहिजे. असे केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण कुठेही अपयशी ठरणार नाही. याशिवाय, ब्रह्म मुहूर्तावर जागे झाल्यानंतर, आपण आपल्या तळहातांची पुढची बाजू पाहिली पाहिजे आणि तळहातांच्या पुढच्या बाजूकडे पाहताना, आपण आपल्या डोळ्यांनी त्यांना स्पर्श केला पाहिजे. असं म्हटलं जातं की धनाची देवी लक्ष्मी तळहाताच्या पुढच्या भागात राहते. अशा परिस्थितीत, जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तावर आपल्या तळहातांकडे पाहतो तेव्हा आपले भाग्य बदलते आणि ब्रह्म मुहूर्तावर जागे झाल्यानंतर आपल्या तळहातांच्या पुढच्या भागाकडे पाहणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)