Numerology Prediction: 'या' 4 तारखांना जन्माला आलेल्या मुली जोडीदारासोबत करतात सुखी संसार

Numerology Prediction : 'या' 4 तारखांना जन्माला आलेल्या मुली जोडीदारासोबत कशा राहतात... 

दिक्षा पाटील | Updated: Mar 15, 2025, 02:03 PM IST
Numerology Prediction: 'या' 4 तारखांना जन्माला आलेल्या मुली जोडीदारासोबत करतात सुखी संसार
(Photo Credit : Freepik)

Numerology Prediction : कोणत्याही व्यक्तीची कुंडली पाहिली की त्याच्या स्वभावापासून त्याच्या भविष्यापर्यंत सगळ्या गोष्टी कळतात. तसंच काहीसं अंकशास्त्राचं असतं. मूलांक पाहून त्या व्यक्तीचा स्वभाव, ती कशी व्यक्ती आहे आणि त्याचं भविष्य काय असेल हे सगळं ओळखता येतं. आज आपण ज्या मुलींचा मुलांक हा 2 असतो त्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांचा स्वभाव आणि पार्टनरसोबत त्यांचे संबंध कसे असतील त्याविषयी जाणून घेऊया. 

मूलांक कसा काढतात...
मूलांक एक व्यक्तीच्या जन्मतारीखवरून काढला जातो. उदाहरणार्थ, मूलांक 2 असलेल्या मुलींची जन्मतारीख ही 2, 11, 20 किंवा 29 असते. आता हे कोणत्याही ठरावीक महिन्यात नाही तर कोणत्याही महिन्याच्या या तारखांना जर त्या मुलींचा जन्म झाला असेल तर तिचा मुलांक हा 2 असतो. 

कसा असतो 2 मूलांक असलेल्या मुलींचा स्वभाव?

मूलांक 2 असलेल्या मुली अत्यंत भावनिक असतात. त्या एकदम निरागस आणि साध्या असतात. अंकशास्त्रानुसार, या मुलींना स्वत: च्या भावनांवर नियंत्रण ठेवता येतं. तर त्या वेळ पाळणाऱ्या असतात सगळ्याच गोष्टी या वेळेत झाल्या पाहिजे असं त्यांचं मत असतं. तर कोणतंही काम करताना त्या उत्साही असतात. त्याशिवाय त्या खूप चांगल्या प्रकारे कोणाशीही संवाद साधू शकतात. 

दयाळू असतात 'या' मुली
ज्या मुलींचा जन्म 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्या खूप दयाळू असतात. त्या एक युनिव्हर्सल जोडीदार म्हणून ओळखले जाते, कारण त्या कोणत्याही व्यक्तीसोबत चांगले संबंध ठेवू शकतात. त्यांचं व्यक्तिमत्व हे आध्यात्मिक आहे आणि छोटी छोटी गोष्टींवर त्यांना भावनात्मक प्रतिक्रिया मिळू शकतात.

आत्मविश्वासाची कमी 

मूलांक 2 ज्या मुलींचा असतो त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असल्याचे जाणवते. त्यांचे निर्णय त्यांच्या भावनांनी प्रभावित होतात आणि त्यांचा मूड बदलत राहतो. त्या अत्यंत संवेदनशील असतात आणि त्यांना निर्णय घेण्यात समस्या येऊ शकतात. त्यामुळे कधी कधी त्यांच्या नात्यात संघर्ष करावा लागू शकतो. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)