प्रेमाचं राशीभविष्य - २३ जून २०१८

सगळीकडे प्रेम... प्रेम... आणि प्रेमच... पण, तुमच्या-आमच्या 'प्रेमाचं भविष्य' काय?

Updated: Jun 23, 2018, 09:02 AM IST

मुंबई : पाऊस सुरू झालाय... झाडांना पालवी फुटू लागलीय... सगळीकडे हिरवळ दिसू लागलीय... वातावरणात गारवा आलाय... लेखकांच्या लेखणीनं वेग धरलाय... कवींना कविता सुचू लागल्यात... सांगायचं काय तर प्रेमाचा मौसम सुरू झालाय... सगळीकडे प्रेम... प्रेम... आणि प्रेमच... पण, तुमच्या-आमच्या 'प्रेमाचं भविष्य' काय? तुम्हीही प्रेमात पडला असाल... कुठपर्यंत होणार तुमच्या प्रेमाचा प्रवास... जाणून घेऊयात 'प्रेमाचं भविष्य'मधून...

मेष

चॅटिंग वेळ घालवण्यात अर्थ नाही, भेटण्याची वेळ ठरवा. 

जवळच्यांना भेटून बोलण्याची संधी देणारा दिवस

मनातलं 'तुफान' समोरासमोर मांडण्याची योग्य वेळ

वृषभ

नवीन मित्र भेटतील, 'ब्रेकअप'चं दु:ख दूर होईल

बऱ्याच दिवसांनी 'मनमोकळं' बोलण्याचं समाधान मिळेल

मिथुन

प्रेमातही 'मर्यादा' असतात, त्या पाळा, त्रास होणार नाही. 

'मर्यादा' ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर साथीदार गमवाल.

कर्क

मोबाईलवर बराच वेळ 'फुकट' घालवल्याची जाणीव.

तुमचा 'निशाणा' चुकलाय हे समजायला उशीर होईल

सिंह

आवडती व्यक्ती आज अचानक डोळ्यासमोर येईल

...आणि हृदयात आज समथिंग समथिंग होईल

पण जरा सावरा, चेहऱ्यावरची 'ती' लाली लपवा

कन्या

जोडीदाराला देत असलेल्या स्पेससाठी

जोडीदाराकडून तुमचं कौतुक होईल...

ती व्यक्तीही तुमचं मन सांभाळण्याचा प्रयत्न करेल

तूळ

मित्रांच्या नसत्या भांडणांत पडू नका.

तुमच्या दैनंदिन जीवनावर परीणाम होवू शकतो.

साथीदाराशी रोमँटिक बोलण्यापेक्षा, जबाबदारपणे बोला

वृश्चिक

दुर्लक्षित केलेल्या मेसेजला उत्तर मिळेल

तुमच्या फोटोला आवडती व्यक्ती दाद देईल

धनु

कॉफी आणि बरंच काही बोलण्याची संधी

न उलगडलेल्या गोष्टी देखील कळतील

मकर

कॉफी आणि बरंच काही बोलण्याची संधी

न उलगडलेल्या गोष्टी देखील कळतील

कुंभ

जोडीदाराच्या रिस्पेक्टसाठी तुम्ही भांडाला

तुमच्या वाईट सवयींमुळे ओरडा पडू शकतो

मीन

नातेवाईकांमध्ये तुमची चर्चा होईल.

तुमच्यावरचं अपेक्षांचं ओक्षं नक्कीच वाढेल