Ravi Pushya Yoga 2023: ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामधील एक रवि पुष्य नक्षत्र आहे. हे नक्षत्र सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्याचसोबत फलदायी योगांपैकी एक मानला जातो. असं मानलं जातं की, पुष्य नक्षत्र ज्यावेळी रविवारी किंवा गुरुवारी येते तेव्हा ते खूप शुभ असते. हा योग अत्यंत शुभ दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 दिवसांनी म्हणजेच येत्या 10 सप्टेंबर रोजी रवि पुष्य योग तयार होताना दिसतोय. त्याचप्रमाणे अजा एकादशीही याच दिवशी येते. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलंय. या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, मालमत्ता खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी काही राशींच्या व्यक्तींना खास लाभ मिळू शकतो.


काय आहे रवि पुष्य नक्षत्र?


वैदिक ज्योतिषात 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. यापैकी पुष्य नक्षत्र 8 व्या स्थानावर येतं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या नक्षत्राच्या निर्मितीने जीवनात स्थिरता येते. शनि हा सूर्य पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे. पण त्याचा स्वभाव बृहस्पतिसारखा आहे. यामुळे हा योग सुख, समृद्धी आणि यश मिळवून देतो.


कधी तयार होणार रवि पुष्य नक्षत्र?


रवि पुष्य योग 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.06 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर 11 सप्टेंबर रोजी सकाळी 6.15 पर्यंत राहणार आहे.


रवि पुष्य नक्षत्रामुळे या राशीच्या व्यक्तींना मिळणार लाभ


मिथुन रास 


मिथुन राशीच्या लोकांसाठी रवि पुष्य नक्षत्र खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात माँ लक्ष्मीच्या कृपेने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. नशिबाची साथ मिळाल्यास प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करता येणार आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल आणि अशा परिस्थितीत तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेऊ शकता. तुमचे संभाषण कौशल्य खूप प्रभावी असू शकतं.


सिंह रास 


सिंह राशीच्या लोकांसाठी रवि पुष्य नक्षत्र खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीत सूर्याला पहिल्या घरात स्थान दिले जातं. यामुळे तुमच्या तिजोरीतील धनात वाढ होऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असं करणं फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील.


तूळ रास 


रवि पुष्य नक्षत्रही या राशीसाठी भाग्यवान ठरू शकतं. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. सामाजिक आदरातही वाढ होईल. व्यवसायात तुम्ही कितीही मेहनत घेतली असेल, त्याचे फळ तुम्हाला आता मिळू शकेल. मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. शेअर बाजारात मोठा लाभ होणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )