जेष्ठ महिन्यामधील पहिली चतुर्थी ही एकदंत/अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. यंदा ही चतुर्थी फार महत्वाची आणि विशेष मानली जात आहे. अंगारकी चतुर्थी ही केव्हा साजरी करायची आहे? अंगारकी चतुर्थीचा मुहूर्त हा केव्हा आहे यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.

एकदंत चतुर्थी ही 4 मे की 5 मे रोजी केव्हा साजरी करायची आहे? त्याचबरोबर चतुर्थी पूजा विधी कशी करावी आणि या अंगारकी चतुर्थीचे महत्त्व काय आहे यासंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामध्ये देण्यात आली आहे. जेष्ठ महिन्यामधील पहिली चतुर्थी ही एकदंत/अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. यंदा ही चतुर्थी फार महत्वाची आणि विशेष मानली जात आहे. एवढेच नाही तर ही अंगारकी चतुर्थी ही सर्वात शक्तिशाली चतुर्थी मानली जात आह. चतुर्थीच्या उपवासांची सुरुवात ही या चतुर्थीपासून केली जाते. या अंगारकीच्या चतुर्थीला शुभ कार्य किंवा पूजा केल्यास सर्व अडथळे दूर होतील त्याचबरोबर तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील.
अंगारकी चतुर्थीला तुम्ही जर उपवास त्याचबरोबर पूजा आणि रात्री चंद्राला नमन केले तर तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. अंगारकी चतुर्थी ही केव्हा साजरी करायची आहे? अंगारकी चतुर्थीचा मुहूर्त हा केव्हा आहे यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
हे ही वाचा
पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीची तारिख ही 5 मे 2026 आहे, ही अंगारकी चतुर्थी सकाळी 5.24 वाजता सुरु होणार आहे, तर 6 मे रोजी 2026 ला सकाळी 7.51 वाजता अंगारकी चतुर्थी संपणार आहे. चंद्रदर्शनबद्दल सांगायचे झाले तर चतुर्थीच्या दिनी 5 मे रोजी रात्री चंद्राचे दर्शन करता येणार आहे. त्यादिवशी चतुर्थीचा उपवास आणि पूजा केली जाते. 5 मे रोजी मंगळवार असल्यामुळे ती अंगारकी चतुर्थी म्हणून या चतुर्थीची ओळख आहे.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिनी सकाळी ब्रम्ह्य मुहूर्तावर उठून अंघोळ करावी, स्वच्छ वस्त्रे देखील परिधान करावी. हातामध्ये पाणी घेऊन उपवास आणि पूजेचा संकल्प करत गणरायाचे स्मरण करावे. एका चौथऱ्यावर लाल कपडा पसरवून गणपतीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही गंगाजलाने अभिषेक करावा किंवा गंगाजल शिंपडावे. तांदळाचे दाणे, हळद, कुंकू, फुले, उदबत्ती आणि दिवा लावून गणपतीची पूजा करावी आणि प्रार्थना करावी. त्यानंतर गणपतीला मोदक किंवा लाडू अर्पण करावे. 'ओम गणपतये नमः' या गणेश मंत्राचा जप करा आणि संकष्टी चतुर्थीची कथा वाचा.