Shani Nakshatra Pada Gochar 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी हा ग्रह अतिशय महत्त्वाचा आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्मदाता आणि न्यायप्रिय देवता मानला जातो. असं म्हणतात की, शनीदेव व्यक्तींना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे शनिदेवाची सर्वसामान्यांना भीती वाटते. पण शनिदेव उगाचच कोणाला कधी त्रास देत नाही. शनिदेव एका राशीत सर्वात अधिक काळ राहत असतो. म्हणजे शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अधिक वेळ घेतो. तो 9 ग्रहांपैकी सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलतो. शनीदेव एका राशीत अडीच वर्ष वास्तव करतो. तसंच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तन आणि नक्षत्र पद परिवर्तनही देखील करत असतो.
उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या चतुर्थ स्थानातील शनीच्या गोचराचे सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पाहिला मिळणार आहे. पंचांगानुसार, शनी 17 एप्रिल 2026 रोजी उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या चतुर्थ पदामध्ये दुपारी 04 वाजून 05 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. शनीचे हे नक्षत्र पद परिवर्तन 12 पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक तर काहींसाठी वादळी ठरणार आहे. तीन राशींसाठी 17 मे म्हणजे एक महिना आर्थिक नुकसान, अपयश आणि तणावाचा राहणार आहे.
या व्यक्तींसाठी कठीण परीक्षेचा काळ असणार आहे. नोकरी आणि व्यवसायासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. कर्जाचा बोजा वाढणार आहे. कौटुंबिक बाबींमधील वाद किंवा मतभेदांमुळे मानसिक ताण येणार आहे.
या लोकांसाठी शनि गोचर आव्हानात्मक असणार आहे. सध्या आर्थिक व्यवहार आणि मोठे व्यावसायिक निर्णय घेणे टाळावे लागणार आहे. घरातील वाद वाढणार आहे. ज्यामुळे मानसिक ताण येणार आहे. उत्पन्न कमी होणार असलं तरी खर्च वाढणार आहे. या काळात तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे.
या व्यक्तींसाठी, शनीचे नक्षत्रांमधून होणारे भ्रमण हानिकारक सिद्ध होणार आहे. आपल्या आर्थिक बाबींबाबत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. तुमचं मोठं नुकसान होणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अडथळे येणार आहात. कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार आहे. तुमच्या व्यावसायिक भागीदाराकडून विश्वासघात होण्याचे संकेत आहेत.
या राशीच्या लोकांसाठी शनि गोचर सकारात्मक परिणाम घेऊन आला आहे. तुम्हाला या काळात नशिबाची साथ मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. करिअरमध्ये हवी तशी प्रगती पाहिला मिळणार आहे. तर व्यावसायिकांना लाभ मिळणार आहे. या एक महिन्यात आयुष्यात आनंदच आनंद नांदणार आहे. उत्पन्नाचे नवीन संधी चालू येणार आहे. आर्थिक बाजू मजबूत होणार आहे.
या लोकांची साडेसाती सुरु आहे, पण शनिचे हे परिवर्तन सकारात्मक परिणाम घेऊन आलं आहे. तुम्ही नवीन कामाची सुरुवात करणार आहात. कामातील अडथळे दूर होण्यास हा काळ फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी योग्य प्रकारे काम मार्गी लावणार आहात. तुमच्या कामावर बॉस प्रसन्न असणार आहे. तर नात्यामध्येही गोडवा येणार आहे.
या राशीच्या लोकांवर शनिदेव प्रसन्न असणार आहे. तुम्हाला या काळात अतिशय लाभ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर आनंदी असणार आहे. ज्या कामात हात घालाल त्यात यश मिळणार आहे. शनिदेवाचे गोचर तुमच्यासाठी मानसन्मान, अभिमान घेऊन आला आहे. व्यापारी लोकांनाही व्यवसायात लाभ होणार आहे.
(Disclaimer या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
(49 ov) 198
|
VS |
SCO
199/3(38 ov)
|
| Scotland beat Namibia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.