Makar Sankranti 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीनुसार मानवी जीवनावर होणारा परिणामबद्दल सांगितलं जातं. ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीतून तयार होणारे योग हे मानवी जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असतात. अशात येणाऱ्या मकर संक्रांतीला तब्बल 100 वर्षांनंतर अत्यंत दुर्मिळ योगायोग घडून येणार आहे. शास्त्रानुसार हा योग अतिशय शुभ असून तो तीन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 15 जानेवारी शुक्र आणि शनि एकमेकांपासून 60 अंशाच्या कोनात स्थित असणार आहे. यातून लाभ दृष्टी योग तयार होणार आहे. चला मग या तीन राशीमध्ये तुमचं रास आहे जाणून घ्या.
लाभ दृष्टी योग तुमच्यासाठी आर्थिकबाबतीत लाभदायक ठरणार आहे. कमी प्रयत्नातही दुप्पट लाभ तुम्हाला मिळणार आहे. एवढंच नाहीतर जिथे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. मित्र किंवा नातेवाईकांसोबत सुरू असलेले कोणतेही आर्थिक वाद मिटणार आहेत. खर्चावर नियंत्रण येणार असून बचत करणार आहात. करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी तुम्हाला अनेक सुवर्ण संधी मिळणार आहेत. अविवाहित व्यक्तींना लग्नाचा चांगला प्रस्ताव येणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होणार आहे.
शुक्र आणि शनीचा हा दुर्मिळ युती तुमच्या जीवनात अनेक बदल घडणार आहेत. मकर संक्रांतीनंतर, उत्पन्नाचे स्रोत हळूहळू वाढणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळणार आहे. व्यावसायिकांना मोठा नफा प्राप्त होणार आहे. तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढ पाहिला मिळणार आहे. तुमचे सर्जनशील काम तुमच्या वरिष्ठांना आनंद देणार आहे. नवीन संपर्क निर्माण होणार असून दीर्घकाळ रखडलेली कामे पुन्हा एकदा वेग घेणार आहे.
लाभ दृष्टी योग तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होणार आहे. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होण्यास मदत मिळणार आहे. या काळात, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून महत्त्वपूर्ण लाभ मिळणार आहे. वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित आनंद मिळणार आहे. तुमची जुनी मैत्रीण भेटणार आहे. घरात वातावरण आनंददायी असणार आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद वाढणार आहे. तुमच्या मुलांसोबत वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा झी 24 तासशी कोणताही संबंध नाही तसेच आम्ही याला दुजोरा देत नाही.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.