आंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये? शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

पिढ्या नो पिढ्या काही रिती आणि प्रथा या आपण पाळत असतो. पण त्या प्रथेमागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण माहिती नसतं. घरातील मोठी मंडळी सांगतात म्हणतात, आंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये.       

नेहा चौधरी | Updated: Dec 14, 2024, 09:48 PM IST
आंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये? शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या title=

हिंदू धर्मात अनेक रिती नियम सांगण्यात आलंय. त्यासोबत प्रत्येक समाजाच्या आपल्या पंरपरा आणि प्रथा असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींबद्दलही शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. त्यातील महत्त्वाचा नियम हा आंघोळबद्दलही सांगण्यात आलंय. घरातील जुनी आणि मोठी मंडळी आपल्या काम सांगतात किंवा लहानपणापासून एक सवय लावतात. आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर ठेवा अशी शिकवण देतात. विवस्त्र आंघोळ करु नका असं सांगतात. पण यामागील कारण हे 99 टक्के लोकांना माहिती नसतं. आज आपण या नियमामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणही जाणून घेणार आहोत. (Shouldnt you take a bath while naked According to Shastras and scientific reason in marathi)

श्रीमद भागवत पुराणातील दहाव्या स्कंधात आणि बाविसाव्या अध्यायात कथा सांगण्यात आलं की, कृष्णासारखा पती आपल्याला मिळावा म्हणून गोपिकांनी कात्यायनी देवीचे व्रत केलंय. हे व्रत करताना गोपिका यमुना नदीत व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन स्नान करत असताना श्रीकृष्ण म्हणाले की, 

यूयं विवस्त्रा यदपो धृतव्रता, व्यगाहतैतत तदु देवहेलनम
बद्धवांजली मुर्धन्यपनुत्तयेsहस: कृत्त्वा नमोsधो वसनं प्रगृह्यताम !!

या श्लोकाचा अर्थ असा होतो की, मुलींनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलेत. त्यामुळे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झालीय. म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या. 

साधा शब्दात सांगायच म्हणजे विवस्त्र होऊ आंघोळ केल्यास जलदेवता आणि वरुण देवता यांची अवहेलना होते. त्यामुळे जलदेवता आणि वरुण देवता यांचा अनादर, अपमान होऊ नये म्हणून विवस्त्र होऊ कधीही आंघोळ करु नये. 

हे असू शकतं या नियमामागील अजून एक कारण 

पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती असायची. अशावेळी आंघोळीसाठी बाथरुम हे वेगवेगळे नसायचे आणि जुन्या काळात त्याला न्हाणीघर म्हटलं जायचं. अनेक घरात त्याला दार नसायचं. परदा लावलेला असायचा. तर काही जुन्या न्हाणीघराला दार असलं तरी त्याला नीट कडी लागायची नाही. त्यामुळे पटकन कोणी आलं, अशावेळी आपल्या अंगावर कपडे नसेल तर आपलं रक्षण होत नाही. हे टाळण्यासाठी आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर असावा हा नियम सांगण्यात आला असावा.