राशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींचा परिवारासोबत दिवस चांगला

पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस   

Updated: Jun 1, 2020, 09:41 AM IST
राशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींचा परिवारासोबत दिवस चांगला

मेष - दिवसभर व्यस्त राहाल. कामकाजासोबत जबाबदाऱ्या वाढतील. व्यापारात समजदारीने निर्णय घ्या. यश नक्की मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.   

वृषभ - दिवस चांहला आहे. जुन्या अडचणी मार्गी लागतील. समाज आणि कुटुंब दोन्ही क्षेत्रातील जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या.उत्पन्न आणि होणाऱ्या खर्चावर विचार करा. 

मिथुन - नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे येणाऱ्या दिवसांत तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क - अचानक धन लाभ होवू शकतो. अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. मित्र परिवार तुमची मदत करेल. कामकाजा संबंधीत नव्या कल्पना सुचतील. दिवस चांगला आहे. 

सिंह - आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. महत्वाकांक्षेत वाढ होईल. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 

कन्या - स्वतःवर असलेलं नियंत्रण आज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. 

तूळ : तुमची काम अडणार नाहीत. कोणतं काम एकदा सुरु झालं की तुमचे संकोच देखील दूर होतील. काहीलोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील. दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर तुमचे लक्ष असेल. सोबतच्या व्यक्तींची मदत मिळेल. 

वृश्चिक : पद, पगार यामुळे तुमचे अधिकार वाढतील. नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल. नोकरीत स्वत:च्या कामावर लक्ष दिलात तर बरं होईल. 

धनू : महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. ज्या तुम्ही आनंदाने स्वीकारलात तर दिवस चांगला राहील. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.

कुंभ : जुने संबंध मजबूत करण्यात यश मिळेल. कोणतं महत्वाचं काम हातात घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे काही महत्वाच्या जबाबदाऱ्यापण आहेत. धनलाभ होऊ शकेल. तुमची ठरवलेली कामं पूर्ण होतील. वडीलांकडून मदत मिळेल.

मीन : तुमच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मनात जे काही चाललं आहे त्यावर विचार केलात तर फायदा होईल. घर-परिवारासोबत जास्त वेळ घालवाल.