आजचे राशीभविष्य | मंगळवार | १४ जानेवारी २०२०
काय म्हणतेय तुमची रास
मेष - दिवस तणावपूर्ण राहिल. जुन्या गोष्टी पुन्हा वर येऊ शकतात. सावध राहा. व्यापारात चढ उतार येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचा योग आहे. कामाच्या निमित्ताने प्रवासयोग असण्याची शक्यता आहे. घाई- गडबड होऊ शकते. अडकलेली कामं पूर्ण होतील.
वृषभ - आज दररोजच्या कामांमधून वेळ काढून काही इतर गोष्टींवरही लक्ष द्या. आनंदी राहा. आज तुम्ही भावनिक असाल. पण, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
मिथुन - जीवनात काय महत्त्वाचे आहे याकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. कामात यश मिळेलव्यापाराच्या नव्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी यश मिळण्याची संधी आहे. नवीन वस्तू खरेदी करु शकता. शुभवार्ता कळू शकेल.
कर्क - कामामुळे तुमच्या जवळील लोकांवर दबाव टाकाल. त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वत:च्या विचारांवर ठाम राह. इतरांशी असणारं नातं आणखी दृढ होईल. काही कामं पूर्ण होतील. साथीदारासोबत बाहेर जाण्याचे योग आहेत.
सिंह - कामासंबंधीत जवळच्या लोकांची मदत कराल. जवळच्या लोकांबाबत चांगली बातमी मिळेल. दिवस आनंदात जाईल. जबाबदारी वाढू शकते. तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कन्या - इतरांबद्दल अधिक विचार करु नका. नव्या विचारांनी काम करा. ताण घेऊ नका. जोडीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा. कामासाठी मेहनत घ्यावी लागेल.
तुळ - कामासाठी प्रवास होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. आज काही कामांच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. सावध राहा. नोकरी- व्यापाराच्या दृष्टीने दिवस आव्हानात्मक असेल. स्वत:वर जास्त लक्ष द्या.
वृश्चिक - आत्मविश्वास ठेवा. कोणत्याही कामाचा ताण घेऊ नका. अडचणींची कामं पूर्ण कराल. कोणाच्याही विरोधात जाऊ नका. काही कामं इच्छेविरुद्ध करावी लागतील. साथीदाराचं सहकार्य मिळेल.
धनु - दिवस चांगला आहे. आनंदी राहाल. काही लोकांना तुमच्याबाबत द्वेष वाटू शकतो. कोणत्याही बाबतीत हट्ट करु नका. आरोग्याची काळजी घ्या. जे मनात येईल त्या गोष्टींकडे लक्ष द्या.
मकर - नवीन काही करण्याचा प्रयत्न कराल पण जे काम पूर्वीपासून करत आहात त्याकडे लक्ष द्या. केलेल्या कामाचा परिणाम मिळू शकतो. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधी अनेक योजना मनात सुरु राहतील. जुन्या मित्राची भेट होण्याचा योग आहे. नवीन नोकरीची संधी आहे.
कुंभ- पूर्ण लक्ष फक्त कामावर केंद्रीत करा. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. प्रसन्न राहाल. सर्वांसोबत प्रेमपूर्ण व्यवहार राहील. जवळपासच्या लोकांची मदत मिळू शकते.
मीन- परिवारामध्ये सुखशांती वाढेल. कार्यक्षेत्रात नवे करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. कोणत्या चांगल्या मित्राशी ओळख होण्याचे योग आहेत. तुमचे लक्ष कोणत्या दुसऱ्या स्थानी जास्त असेल. ऑफिसमध्ये कोणती व्यक्ती गुप्त रितीने तुमची मदत करेल.