Baba Vanga Prediction 2026 : सिंह राशीसह या 5 राशींचं बँक बॅलेन्स सुधारणा; कसा असेल हा आठवडा बाबा वेंगाची भविष्यवाणी?

Baba Vanga Horoscope Prediction 6 to 12 April 2026 in Marathi :  जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची नेहमीच चर्चा होत असते. ज्योतिषीय विश्लेषण आणि त्यांच्या विधानांनुसार, एप्रिलचा हा आठवडा पाच राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. चला पाहूया, 6 ते 12 एप्रिलसाठी बाबा वेंगा यांच्या भाकितांचा कोणत्या राशींसाठी आहे ते...

नेहा चौधरी | Updated: Apr 6, 2026, 08:14 AM IST
Baba Vanga Prediction 2026 : सिंह राशीसह या 5 राशींचं बँक बॅलेन्स सुधारणा; कसा असेल हा आठवडा बाबा वेंगाची भविष्यवाणी?

Baba Vanga Horoscope Prediction 6 to 12 April 2026 in Marathi : बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाण्या या भारतासह जगभरात प्रसिद्ध आहेत. शतकांपूर्वी, बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी बऱ्याच आता खऱ्या ठरल्यामुळे त्यांचे भाकीत वारंवार चर्चेत येत असतं. एप्रिल महिन्याच्या या आठवड्यासाठी 6 ते 12 एप्रिलसाठी, त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या मोठ्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. बाबा वेंगा यांच्या मते, या आठवड्यात पाच राशींना त्यांच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदलांचा पाहिला मिळतील. चला मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत, त्या लकी राशी...

Add Zee News as a Preferred Source

मेष रास 

बाबा वेंगा यांच्या मते, हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. या राशीच्या नोकरदार व्यक्तींना या आठवड्यात त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा प्राप्त होणार आहे. नवीन जबाबदाऱ्याही खांद्यावर पडणार आहे. ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय प्रगती पाहिला मिळणार आहे. या आठवड्यात, या व्यक्तींचे फ्लॅट किंवा जमीन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ते आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहेत. या काळात आत्मविश्वास वाढणार असून निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होणार आहे.

सिंह रास

बाबा वेंगा यांच्या मते हा आठवडा या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. सूर्याच्या शुभ प्रभावामुळे, हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल राहणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची किंवा जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याचे शुभ संकेत आहेत. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते या आठवड्यात परत मिळणार आहे. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. व्यवसायातील चालू असलेल्या समस्यांचे निराकरण होणार आहे. कुटुंबात शांतता आणि आनंद नांदणार आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी देखील हा काळ शुभ असणार आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Aajche Rashi Bhavishya 6 April 2026 : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा, तर यांना आर्थिक चणचण; मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा?

 

वृश्चिक रास 

बाबा वेंगा यांच्या मते हा आठवडा तुमच्यासाठी यश घेऊन आला आहे. तुमचा सामाजिक दर्जा वाढणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. जर तुम्ही न्यायालयीन खटल्यांमध्ये अडकले असाल, तर या आठवड्यात तुम्हाला दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी आणि व्यवसायात असलेल्यांना या काळात नवीन संधी मिळणार आहे. तुमची नेतृत्व कौशल्ये देखील तुम्हाला पुढे जाण्यास मदत करणार आहे. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याविषयीची कोणतीही चिंता या आठवड्यात दूर होणार आहे.

मकर रास

बाबा वेंगा यांच्या मते हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सध्याच्या समस्या सुटणार आहे. अनेक अडचणी दूर होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी मानसिक आणि भावनिक शक्ती वाढणार आहे. जुने वाद मिटून जीवनात स्थिरता येणार आहे. तुम्हाला कुटुंब किंवा प्रियजनांसोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. एप्रिलचा हा आठवडा करिअरमध्ये प्रगती दर्शवतो आणि एक मोठा निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

कुंभ रास 

बाबा वेंगा यांच्या मते हा आठवडा तुमच्यासाठी कष्टाचे फळ देणारा सिद्ध होणार आहे. या आठवड्यात तुमची प्रमुख व्यक्तींशी ओळख होणार आहे. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा मिळणार आहे. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील दीर्घकालीन प्रयत्नांना आता फळ मिळणार आहे. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असाल, तर हा आठवडा तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळणार असून तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या प्रेम जीवनातील गैरसमज दूर होणार असून तुमच्या नात्यात पुन्हा दृढता येणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More